एक्स्प्लोर
Smartphone Battery : तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग लवकर उतरतेय? 'हे' 10 ॲप्स आहेत कारण, यादीतील नावं पाहून बसेल झटका
Harmful Apps For Your Mobile : काही लोकप्रिय ॲप्स तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपवतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर, हे ॲप्स कारणं आहेत, सविस्तर यादी पाहा.
Smartphone Battery Draining Issue : स्मार्टफोनसाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे ॲप लाँच होत असतात. यामध्ये अनेक ॲप्स खूप उपयुक्त ठरतात, तरी काही ॲप्स मोबाईलसाठी घातक ठरू शकतात. काही ॲप्स तुमचे दैनंदिन जीवन सोपे करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. काही ॲप्स मनोरंजन करण्यासाठी वापरले जातात, तर काही इतर कामांसाठी वापरले जातात. पण यापैकी अनेक ॲप्स तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीचा सर्वाधिक वापर करताा, ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते, हे तुम्हाला माहिती आहे. यामध्ये शॉपिंग ॲप्स ते गेमिंग ॲप्स, सोशल मीडिया ॲप्स आणि हवामानाची माहिती देणाऱ्या ॲप्सचा समावेश आहे. तर, आम्ही तुम्हाला अशाच 10 ॲप्सबद्दल सांगतो जे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जलद संपवतात...
- कँडी क्रश सागा (Candy Crush Saga) : हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. तुम्ही हा गेम स्वतः खेळत असाल किंवा मेट्रो ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना कोणीतरी हे ॲप वापरताना पाहिले असेल. हा ॲप वापरल्याने केवळ जास्त बॅटरी वापरली जात नाही तर ते डेटा देखील खूप जलद वापरते.
- फेसबुक (Facebook) : भारतातील स्मार्टफोनमध्ये फेसबुक ॲप नसणं दुर्मिळ आहे. फेसबुक ॲपही खूप बॅटरी वापरतो.
- ओएलएक्स (OLX) : जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीचं हे ॲपची तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप वेगाने संपवते.
- व्हॉट्सॲप (WhatApp) : या यादीत व्हॉट्सॲपचं नाव पाहून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे. व्हॉट्सॲप बॅटरीच्या वापराच्या बाबतीत खूप पुढे आहे.
- गुगल प्ले सर्व्हिसेस (Google Play Services) : हे ॲप अनेक स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच आहे. पण, हे ॲप देखील भरपूर बॅटरी वापरते. त्यामुळे जर तुम्ही हे ॲप वापरत नसाल तर हे ॲप तुमच्या स्मार्टफोनमधून काढून टाकणं योग्य ठरेल.
- क्लॅश ऑफ क्लान्स (Clash of Clans) : हे गेमिंग ॲप देखील खूप जलद बॅटरी वापरते.
- पेट रेस्क्यू सागा (Pet Rescue Saga) : कँडी क्रश प्रमाणे, पेट रेस्क्यू सागा हा देखील खूप लोकप्रिय गेमिंग ॲप आहे. हा गेम खेळल्याने तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तसेच डेटाही वेगाने संपते.
- लुकआउट सिक्युरिटी आणि अँटीव्हायरस (Lookout Security & Antivirus) : हे मोबाईल सिक्युरिटी ॲप आहे पण बॅटरी वापरण्याच्या बाबतीत हे ॲप खूप वेगवान आहे.
- अँन्ड्रईड व्हेदर अँड क्लॉक विजेट (Android Weather & Clock Widget) : अँड्रॉइड वेदर आणि क्लॉक विजेट जास्त बॅटरी खर्च करते.
- सॉलिटेअर (Solitaire) : सॉलिटेअर ॲप तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप वेगाने संपवते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WhatsApp Update : व्हॉट्सॲपचं भन्नाट प्रायव्हसी फिचर! मोबाईल नंबर शेअर न करताच करता येणार चॅट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement