Google Chrome : नवीन वर्षात गुगलने युजर्सना दिले स्पेशल गिफ्ट, आता कोणतीही वेबसाईट ट्रॅक नाही करू शकणार तुमचा डाटा!
Google Chrome वर आता नवं फिचर आलं आहे. या फिचरमुळे आपला डेटा सुरक्षित राहण्याचा दावा केला जात आहे. ते फिचर कोणतं आहे आणि किती सुरक्षित आहे?, पाहुयात..
Google Chrome: जेव्हा तुम्ही गुगलवर किंवा गुगल क्रोम वर कोणतीही (Google Chrome) वेबसाईट ओपन करता तेव्हा तुम्हाला तिथे 'Accept All Cookies' असं ऑप्शन येतं. ज्याला Accept केल्यानंतर त्या वेबसाईटवर अजून काही चांगल्या सुविधा मिळतील, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्या कुकीजना अॅक्सेप्ट केल्यावर तुमच्या वेबसाईटचा डाटा तिथं ट्रॅक केला जातो. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. काही सायबर गुन्हे किंवा फसवणूकीच्या गोष्टी सुद्धा या कुकीजमुळे घडून येतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे जगभरातील प्रत्येक गुगल युजर नाराजी व्यक्त करीत होता. Google Chrome वर आता नवं फिचर आलं आहे. ते फिचर कोणतं आहे आणि किती सुरक्षित आहे?, पाहुयात..
Google Chrome मध्ये कोणते आलेत नवीन फिचर?
ट्रॅक केलेल्या डाटाचा वापर करून युजर्सना त्यांच्या गरजेनुसार जाहिराती दाखवल्या जातात. आलेल्या नवीन वर्षात म्हणजेच 2024 मध्ये गुगलने आपल्या करोडो युजर्सना एक नवीन गिफ्ट दिलेलं आहे. आता गुगलच्या क्रोमवर कोणत्याही वेबसाईटवर ब्राउझ करणाऱ्या युजरचा कोणताही डाटा ट्रॅक करता येणार नाही.
थर्ड पार्टी कुकीजमुळे काय होतं?
google ने आपल्या chrome ब्राउझरमध्ये एक नवीन फिचर अॅड केला आहे. ज्याचा वापर करून युजर्स थर्ड पार्टी कुकीजला डिसेबल करू शकतात. ही वेब कुकीज खूप छोटी फाईल असते, जी कोणत्याही वेबसाईटला ओपन करताना युजरच्या फोनमध्ये सेव्ह होते. याच कारणामुळे तुम्ही जेव्हा काही खास गोष्टींना सर्च करता तेव्हा त्याच्या संबंधी अनेक जाहिराती तुम्हाला परत परत बघायला मिळतात. यामुळे तुम्हाला आणि अशा कित्येक युजर्सना खूप त्रास सहन करावा लागतो.
सगळ्या युजर्ससाठी रोलआउट झालेला नवीन फिचर नक्की आहे तरी काय?
गुगलने आपल्या chrome ब्राउझरमध्ये हे फिचर सध्या काही निवडक यूजर्ससाठी उपलब्ध करून दिलेला आहे. गुगल अशा पद्धतीने या फिचरचे टेस्ट करत आहे. गुगलने या संबंधी सांगताना असं म्हटलं आहे की या फिचरची सध्या टेस्ट केली जात आहे. आणि अवघ्या काही महिन्यातच जगभरातील सगळ्या क्रोम युजर्सना या फिचरसाठी रोलआउट केलं जाईल. प्रायव्हेट लाइफ आणि सेफ्टीबद्दलच्या अनेक तक्रारी या फिचरमुळे कमी व्हायला मदत होईल.
इतर महत्वाची बातमी-