Increase Smartphone Battery Life : फोनची बॅटरी 3 ते 4 तासात संपते? आजच 'या' सेटिंग्ज ऑन करा, तुम्हाला मिळेल दमदार बॅकअप
आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देत आहोत ज्या तुम्ही करू शकता आणि यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढते. कोणत्या आहे त्या टिप्स पाहुयात...
Increase Smartphone Battery Life : आज जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोन वापरू (Battery )लागला आहे. स्मार्टफोन जितका महत्त्वाचा आहे, तितकाच फोनची बॅटरीही महत्त्वाची आहे. कारण फोन गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया ब्राउझ करणे, मित्रांशी चॅटिंग करणे, ईमेल करणे अशा गोष्टी करतो आणि यामुळे बॅटरी लवकर संपते. तसे तर कंपन्या हळूहळू योग्य चार्जिंगमध्ये सुधारणा करत आहेत पण मग अनेकदा फोनची बॅटरी लाईफ आपल्याला हवी तितकी नसते. अशावेळी आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देत आहोत ज्या तुम्ही करू शकता आणि यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढते.
कोणत्या आहेत 'त्या' महत्वाच्या टिप्स?
1. बॅटरी सेव्हर मोड ऑन करा.
बॅटरीशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्याआधी तुमच्या फोनची बॅटरी कशामुळे संपत आहे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला अँड्रॉइडच्या सेटिंगमध्ये जाऊन मग बॅटरी मेन्यूवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बॅटरी हेल्थ रिपोर्ट मिळेल. जर कोणतेही अॅप जास्त बॅटरी वापरत असेल तर येथे तुम्हाला एक इशारा दिसेल. बॅटरी मेनूमधील सर्व डिटेल्ससोबत तुम्हाला बॅटरी सेव्हर मोडही दिसेल. तुम्ही ते चालू करू शकता. डिफॉल्टनुसार, हे बॅटरीच्या 15 टक्के चालू करते, परंतु आपणऑन-डिमांड सुरू करण्यासाठी त्यावर टॅप करू शकता. यामुळे फोनची बॅटरी अधिक काळ चालते.
स्क्रीन रिझोल्यूशन कमी करा
सर्व फोन आपल्याला स्क्रीन रिझोल्यूशन सेटिंग करण्याची परवानगी देत नाहीत. पण सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनबद्दल बोलायचे झाले तर तो क्वाड-एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि डिफॉल्टनुसार तो फुल-एचडी+ आहे. हे बॅटरीचा कमी ड्रेन करण्यासाठी आहे. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डिस्प्लेवर जाऊन स्क्रीन रिझोल्यूशनवर जा. त्यानंतर सॅमसंग फोनमधील आपली स्क्रीन रिझोल्यूशन सेटिंग्ज तपासा.
4. नोटिफिकेशनचे प्रमाण कमी करा
आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले जवळजवळ प्रत्येक अॅप आपल्याला कधी ना कधी नोटिफिकेशन नक्कीच देते. प्रत्येक अॅपच्या नोटिफिकेशनची गरज नसते. अशावेळी जर तुमच्या फोनमध्ये अनेक अॅप्सचे नोटिफिकेशन्स असतील जे वापरतही नाहीत, तर तुम्ही ते बंद करावेत. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्स आणि नोटिफिकेशनमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनवर जाऊन कोणत्या अॅप्सना नोटिफिकेशन पाठवण्याची परवानगी द्यायची आहे हे ठरवूव त्यावर क्लिक करावं लागेल आणि नको असलेल्या परवानग्यादेखील बंद करु शकता.
इतर महत्वाची बातमी-