Extension Board : जर तुम्ही 'असा' एक्स्टेंशन बोर्ड वापरत असाल तर वेळीच सावध व्हा; स्फोट होण्याचा वाढू शकतो धोका
Extension Board : एक्स्टेंशन बोर्ड वापरताना ग्राहकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते गरजेनुसारच एक्स्टेंशन बोर्डमधून वायर काढतात.
Extension Board : एक्स्टेंशन बोर्ड (Extension Board) ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात, प्रत्येक दुकानात, मॉलमध्ये किंवा रस्त्यावरच्या गाडीवर प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी स्विच बोर्ड (Switch Board) नाहीत अशा ठिकाणी एक्सटेंशन बोर्डचा सर्वाधिक वापर केला जातो. या ठिकाणी पंखे, कुलर आणि टीव्ही यांसारखी विद्युत उपकरणे चालवण्यासाठी एक्स्टेंशन बोर्ड वापरले जातात. मार्केटमध्ये सर्व किंमतीत रेंज आणि क्वालिटीमध्ये अनेक एक्सटेंशन बोर्डचे पर्याय उपलब्ध आहेत.
एक्स्टेंशन बोर्डमध्ये 15 मीटर किंवा 10 मीटरची वायरही दिली जाते, ज्याचे एक टोक एक्स्टेंशन बोर्डला जोडलेले असते आणि दुसऱ्या टोकाला एक प्लग असतो, ज्याद्वारे तुम्हाला घरामध्ये असलेल्या बोर्डमधून वीजपुरवठा मिळतो. पण, यामध्ये या सगळ्यामध्ये अनेकदा लोक काही चुका करतात. ज्यामुळे एक्स्टेंशन बोर्डला आग लागते आणि क्षणार्धात आगीच्या धुरांनी वेढले जाते.
एक्स्टेंशन बोर्ड वापरणे ही सर्वात मोठी चूक
एक्स्टेंशन बोर्ड वापरताना ग्राहकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते गरजेनुसारच एक्स्टेंशन बोर्डमधून वायर काढतात. तुम्ही देखील अशाच प्रकारे एक्स्टेंशन बोर्ड वापरत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. वायर आतून कापल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. तसेच उन्हाळ्यात भार वाढल्याने वायर गरम होऊन एकत्र चिकटून फुटू शकतात.
एक्स्टेंशन बोर्ड खरेदी करताना 'हे' लक्षात ठेवा
एक्स्टेंशन बोर्ड खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एक्स्टेंशन बोर्ड खरेदी करता तेव्हा ते ब्रँडेड आणि विश्वासार्ह कंपनीकडूनच खरेदी करा. तसेच, त्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या गॅझेट्सचा भार लक्षात घेऊन, समान पॉवर असलेला एक्सटेंशन बोर्ड खरेदी करावा.
एक्स्टेंशन बोर्डमुळे घरात आग लागण्याची शक्यता
जर तुम्ही खालच्या दर्जाचे एक्स्टेंशन बोर्ड वापरत असाल आणि ते वापरण्यात निष्काळजीपणा करत असाल तर शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण घराला आग लागू शकते. तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देखील लागू शकतो. म्हणून, जेव्हा जेव्हा एक्सटेंशन बोर्ड वापरला जातो तेव्हा अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू वापरत असताना घरातील ज्येष्ठ व्यक्ती तसेच लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा.
महत्त्वाच्या बातम्या :