OnePlus Smartphone : OnePlus चा हा स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लॉन्च; कॅमेरा फिचर्ससह 'या' गोष्टी आहेत खास
OnePlus Smartphone : लॉन्च इव्हेंट 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता सुरू होईल आणि त्याच वेळी त्याची किंमत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
OnePlus Smartphone : OnePlus त्याचा OnePlus 12R Genshin Impact Edition स्मार्टफोन 28 फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारपेठेसाठी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कस्टम डिव्हाईस देशात लॉन्च होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी गेमचे भारतीय चाहते उत्सुक होते. आता OnePlus ने या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. वनप्लस स्मार्टफोनमध्ये नेमकं काय खास असणार आहे? याचे कॅमरा फीचर्स नेमके कसे आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कंपनी 'या' ऑफर्स देतेय
OnePlus 12R चा लॉंचिंग इव्हेंट येत्या 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता सुरू होईल आणि त्याच वेळी त्याची किंमत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनच्या लॉंचिंग इव्हेंटच्या अगोदर, OnePlus ने त्याच्या अधिकृत वेबसाईटवर 'Notify Me' पर्याय सुरू केला आहे, जिथे चाहत्यांना स्पेशल एडिशन फोन जिंकण्याची संधी मिळत आहे. तसेच 40 विजेत्यांना OnePlus 12R साठी 40,000 Primogems आणि Rs 1,000 चे एक्सचेंज कूपन जिंकण्याची संधी देते. याव्यतिरिक्त, लाँचशी संबंधित सर्वेक्षणातील 30 सहभागींना प्रत्येकी 500 प्रिमोजेम्सचे बक्षीस दिले जाऊ शकते.
OnePlus 12R Genshin Impact Edition हे गेम कॅरेक्टर Kaking द्वारे प्रेरित डिझाइनसह येईल, ज्यामध्ये इलेक्ट्रो-व्हायलेट कलर आणि उद्योगातील सर्वात आधी इलेक्ट्रो-एचिंग प्रक्रिया समाविष्ट असेल. हा स्मार्टफोन खास गेन्शिन इम्पॅक्ट-थीम असलेली वस्तूंसह कस्टम-डिझाईन केलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये विकला जाईल.
OnePlus 12R ची वैशिष्ट्ये काय?
विशेष व्हर्जनमध्ये स्टॅंडर्ड OnePlus 12R मॉडेल सारखीच वैशिष्ट्ये असतील, ज्यामध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78-इंच AMOLED डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट, गोरिला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण, स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 प्रोसेसर यांचा समावेश आहे. हे Android 14 वर आधारित OxygenOS 1 वर चालते. कंपनी तीन प्रमुख अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स आणि त्यावर चार वर्षांची सुरक्षा अपडेट्स सुद्धा देणार आहे.
'हे' असतील कॅमेरा फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 100W चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी, 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मोठा सेन्सर आहे. स्मार्टफोनच्या इतर विशेष वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल स्पीकर, एक IR ब्लास्टर, NFC आणि IP65-रेटेड चेसिस यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :