ChatGPT पेक्षाही पॉवरफुल आहे GPT-4, फक्त फोटो पाहून देईल प्रश्नाची उत्तरे; जाणून घ्या संपूर्ण माहिती
ChatGPT 4 Launch : OpenAI च्या ChatGPT ने जगभरात तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडून आणली आहे. यातच आता कंपनीने आणखी एक नवीन चॅटबॉट सादर केला आहे.
ChatGPT 4 Launch : OpenAI च्या ChatGPT ने जगभरात तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडून आणली आहे. यातच आता कंपनीने आणखी एक नवीन चॅटबॉट सादर केला आहे. नव्याने लॉन्च झालेला चॅटबॉट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट ChatGPT चे नवीन व्हर्जन आहे. ओपन एआयचे म्हणणे आहे की, यामध्ये युजर्सला पूर्वीपेक्षा चांगली कन्टेन्ट क्वालिटी आणि तथ्यात्मक माहिती मिळू शकेल. या चॅटबॉटचे नाव ChatGPT 4 आहे. ChatGPT सर्वांसाठी उपलब्ध आहे. परंतु सध्या निवडक युजर्ससाठी ChatGPT 4 सादर करण्यात आले आहे. नवीन ChatGPT 4 मध्ये काय आहे खास, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ...
ChatGPT 4 Launch : ChatGPT 2022 मध्ये झाला होता लॉन्च
मायक्रोसॉफ्टच्या मालकीची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारी कंपनी OpenAI ने नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPT लॉन्च केले होते. लोकांना या चॅटबॉटची माहिती मिळताच त्याचा वेगाने वापर होऊ लागला. ChatGPT आल्यानंतर सर्वत्र AI ची चर्चा सुरू झाली.
ChatGPT 4 Launch : ChatGPT चे नवीन व्हर्जन
Open AI ने आता ChatGPT चे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. जे ChatGPT च्या तुलनेत चांगले आणि अधिक अचूक असल्याचे सांगितले जात आहे. Open AI म्हणते की, GPT-4 पेक्षा चांगले language लॅन्गवेज मॉड्यूल तयार केले जाऊ शकते. ChatGPT-4 क्रिएटिव्ह आणि तांत्रिक रायटिंग टास्क जनरेट आणि एडिट करू शकते. या चॅटबॉटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मजकूर तसेच फोटो हॅण्डल करू शकतो. म्हणजेच याच्या मजकूर आणि फोटोच्या माध्यमातूनही तुम्ही तुम्हाला हवे असलेले उत्तर याद्वारे मिळवू शकता. OpenAI ने त्या परीक्षांची लिस्ट ही जाहीर केली आहे, ज्यात GPT-4 पास झाला आहे. कंपनीने याचे गुणही शेअर केले आहेत. GPT-4 ने LSAT वर 88%, SAT Math 89%, GRE Quantitative 80%, GRE Verbal वर 99% आणि लेखनात 54% गुण मिळवले आहेत.
Announcing GPT-4, a large multimodal model, with our best-ever results on capabilities and alignment: https://t.co/TwLFssyALF pic.twitter.com/lYWwPjZbSg
— OpenAI (@OpenAI) March 14, 2023
ChatGPT 4 Launch : GPT-4 मोफत वापरता येईल का?
ChatGPT 4 मध्ये देखील ChatGPT प्रमाणेच प्रवेश केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त ओपन एआयच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे ChatGPT Plus सबस्क्रीप्शन असणे आवश्यक आहे. याच्या सबस्क्रीप्शनसाठी तुम्हाला 20 डॉलर्स शुल्क द्यावे लागतील.