Microsoft Build 2023 मध्ये करण्यात आल्या 6 मोठ्या घोषणा, गुगलऐवजी 'हे' ChatGPT डिफॉल्ट सर्च इंजिन
मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर वाढवण्यासाठी सहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचा अनेक क्षेत्रातील कामासाठी उपयोग होणार आहे.
Microsoft Build 2023 : मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2023 ला मंगळवारपासून सरूवात झाली आहे. यामध्ये टेक्नॉलॉजीतील दिग्गज सहभागी झाले होते. यांनी विंडोज-11, मायक्रोसॉफ्ट 365 सोबत आपले इतर अॅप्स आणि सेवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर वाढवण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. याबद्दल मायक्रोसॉफ्टने सांगितले की, हे एक बहुभाषिक एआय चॅटबॉट असून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना सरकारी योजनांची माहिती सांगणार आहे. Microsoft Build 2023 च्या मुख्य सत्रामध्ये सीईओ सत्य नडेला यांनी एआय कोपायलट स्टॅक (AI Copilot), विडोज 11 साठी कोपायलट (Copilot), चॅटजीपीठीसाठी बिंग सर्च इंजिन इत्यादी घोषणा केल्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
आता विंडोज 11 साठी एआय कोपायलट (AI Copilot)
आता मायक्रोसॉफ्टने AI Copilot ची घोषणा केली आहे. विंडोज 11 मध्ये Copilot उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे एक पर्सनल असिस्टंट असून ज्याला याआधीपासूनच कंपनीने एज, ऑफिस अॅप्स आणि गिटहब या चॅटबॉटमध्ये समावेश करत आला आहे. हे कोपायलट टास्कबारमध्ये उपलब्ध असणार आहे.
मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट (AI Copilot)
आता मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट (AI Copilot) एआय असिस्टंट तीन प्रकारच्या प्लग-इनला सपोर्ट करणार आहे. ज्यामघ्ये Teams मॅसेज एक्सटेंशन, पावर प्लॅटफॉर्म कनेक्टर्स यासारख्या टूल्सचा समावेश आहे. हे टूल्स ChatGPT टेक्नॉलॉजीचा करतात. युजर्सना Atlassian आणि Adobe आदींसारखे थर्ड पार्टी प्लग-इनचा पर्याय निवडण्याची सुविधा आहे.
365 कोपायलटसह Edge टूल्स उपलब्ध
मायक्रोसॉफ्टने Edge टूल्समध्ये 365 कोपिलॉट उपलब्ध करून देणार आहे. हे टूल ब्राऊजरच्या साईडबारमध्ये असणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, व्यावसायिक उद्देशासाठी Edge टूल्सला टॉप ब्राउजर करणार आहोत.
व्यावसायिकांना मायक्रोसॉफ्ट Edge टूल्सचा होणार उपयोग
कंपनीने हायब्रिड वर्क एनवायरमेंटसाठी सपोर्ट करण्यासाठी व्यावसायिक उद्देशासाठी मायक्रोसॉफ्ट Edge टूल्स आणले आहे. हे व्हर्जन इंटरप्राईज-ग्रेड कंट्रोल, सिक्युरिटी फिचर आणि प्रॉडक्टिव्हिटीची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. Edge फॉर बिजनेसला एज्योर अॅक्टिव्ह डायरेक्ट्री (AAD) लॉगिनच्या माध्यमातून सक्रिय केलं जाऊ शकते.
विंडोज टर्मिनलमध्ये एआय (AI) अपग्रेड
विंडोज टर्मिनलमध्ये गिटहब कोपायलटसह सोबत कृत्रिम बुद्धीमत्तेवर चालणारे चॅटबॉट उपलब्ध असणार आहे. या चॅटबॉटचा विविध कामासाठी उपयोग होणार आहे. यामध्ये कोड रिकमेंडशन आणि एररच्या स्पष्टीकरणासाठी चॅटबॉटचा उपयोग होणार आहे. आता Bing चॅटजीबीटीचे डिफॉल्ट सर्च इंजिन ओपन एआय कंपनीने आपल्या चॅटजीबीटी चॅटबॉटमध्ये Bing ला डिफॉल्ट सर्च इंजिन बनवणार आहे. आजपासून ( 23 मे ) युजर्सना चॅटजीबीटी आणि चॅटबॉटसह Bing वरील सजेशन्सही पाहता येणार आहेत.