एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
योगेश्वरला लंडन ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
मुंबई: भारताचा पैलवान योगेश्वर दत्तला लंडन 2012 ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकाऐवजी सुवर्णपदक मिळू शकतं. कारण लंडन ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह उत्तेजक सेवन चाचणीत दोषी असल्याची माहिती मिळते आहे.
याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरच्या साठ किलो वजनी गटात रौप्यपदकाचा मानकरी ठरलेला रशियाचा पैलवान बेसिक खुदोखोजनं उत्तेजकाचं सेवन केल्याचं पुनर्चाचणीत आढळून आलं आहे.
दरम्यान, योगेश्वरचीही लवकरच डोपिंग टेस्ट होणार आहे. त्यामुळे या चाचणीनंतरच याबाबत चित्र स्पष्ट होईल. याआधी लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदकासाठी योगेश्वरच्या नावाची चर्चा सुरु होती. रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोखोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.
2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियाच्या बेसिक खुदोखोजने हे रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर 2013 साली एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला.
त्यानंतर आता लंडन ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह हा देखील उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे.
संबंधित बातम्या:
म्हणून दिलदार योगेश्वर दत्तचा रौप्यपदक घेण्यास नकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement