(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022 : आजही विश्वचषक स्पर्धेत रंगणार दोन सामने, वाचा कोणते संघ आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेचा तिसरा दिवस असून आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. आजही दोन सामने खेळवले जाणार असून यावेळी पहिला सामना नामिबिया आणि नेदरलँड (NAM vs NED) तर दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध युएई (SL vs UAE) असा रंगणार आहे. नामिबियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला मात दिली होती, तर नेदरलँडने युएईला मात दिली होती. त्यामुळे दोघेही आपल्या दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरतील. तर युएई, श्रीलंका स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी मैदानात येतील, तर आज पार पडणाऱ्या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कोणा-कोणाचे आहेत सामने?
आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला नामिबिया विरुद्ध नेदरलँड आणि दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध युएई असा रंगणार आहे.
कधी होणार सामने?
भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना नामिबिया विरुद्ध नेदरलँड सकाळी 9.30 वाजता तर दुसरा श्रीलंका विरुद्ध युएई सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.
कुठे आहेत सामने?
आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या जिलाँग येथील सायमंड्स या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
दुसऱ्या दिवशी स्कॉटलंडसह झिम्बाब्वेची विजयी सलामी
दुसऱ्या दिवशी झालेल्या स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडीज (SCO vs WI) सामन्यात वेस्ट इंडीजसारख्या अनुभवी संघाला स्कॉटलंडनं तब्बल 42 धावांनी पराभूत केलं आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर आजचा स्कॉटलंडचा विजयही आश्चर्यकारक आहे. आधी बॅटिंग करत स्कॉटलंडनं वेस्ट इंडीजला विजयासाठी 161 धावांचं लक्ष्य दिले. ज्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ 118 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ 43 धावांनी सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करत 31 धावांनी सामना जिंकला. यावेळी प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, पण आयर्लंडचा संघ 20 षटकांत 143 धावाच करु शकल्याने झिम्बाब्वेने 31 धावांनी सामना जिंकला. यावेळी सिंकदर रझा या झिम्बाब्वेच्या स्टार खेळाडूने 82 धावांची तडाखेबाज खेळी केली.
हे देखील वाचा-