Women T20 World Cup : भारतासह तीन संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, पाहा गुणतालिकाची स्थिती
Points Table : भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यासोबत ग्रुप ब मध्ये होता. या ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही संघाची नावे निश्चित झाली आहे.
Womens T20 World Cup 2023 Points Table : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये आज झालेल्या सामन्यात भारताने आयरलँडचा पाच विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यासोबत ग्रुप ब मध्ये होता. या ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही संघाची नावे निश्चित झाली आहे. ग्रुप ब मधून भारत आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप ब मध्ये इंग्लंडचा संघ अजेय आहे. इंग्लंड संघाने आपले सर्व तीन सामने जिंकले आहेत. तर भारताच्या संघाला चारपैकी तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयरलँडचा पराभव केला. तर इंग्डंकडून पराभव स्विकारला. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत ग्रुप ब मध्ये सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अद्याप एक सामना बाकी आहे.
उपांत्य फेरीचं समीकरण काय ?
ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, श्रीलंका, दक्षिण अफ्रीका आणि बांग्लादेश हे संघ ग्रुप अ मध्ये आहेत. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अद्याप दुसऱ्या संघाचं नाव निश्चित व्हायचं आहे. ऑस्ट्रेलिया संघानं साखळी फेरीतील सर्व चार सामने जिंकले आहेत. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे चार सामन्यात चार गुण आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश या संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. यजमान दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्यात एक विजय मिळवला असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. पण त्यांना उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिका कसं पोहचणार उपांत्य फेरीत ?
साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेचा अद्याप एक सामना बाकी आहे. बांगलादेशविरोधात होणारा सामना दक्षिण आफ्रिाकनं मोठ्या फरकानं जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित मानला जातोय.
Women T20 WC : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, आयरलँडला पाच विकेट्सने हरवलं
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 156 धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडियाकडून सलामी फलंदाज स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. स्मृतीने 56 चेंडूत 9 चौकार आणि तीन षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. स्मृतीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दमदार फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.