Women T20 WC : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, आयरलँडला पाच विकेट्सने हरवलं
T20 WC 2023 : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये 'करो या मरो'च्या सामन्यात भारताने आयरलँडचा पाच विकेट्सने पराभव केला.
India vs Ireland, Women T20 WC 2023 : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये 'करो या मरो'च्या सामन्यात भारताने आयरलँडचा पाच विकेट्सने पराभव केला. आयरलँडच्या फलंदाजीवेळी पावसाने व्यत्यय आणला, परिणामी सामना थांबवावा लागला. पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला पाच विकेट्सने विजयीय घोषित केलं. या विजयासह भारताने टी 20 विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 156 धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडियाकडून सलामी फलंदाज स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. स्मृतीने 56 चेंडूत 9 चौकार आणि तीन षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. स्मृतीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दमदार फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
टी20 वर्ल्ड कपमध्ये आयरलँडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहचणारा भाराताचा तिसरा संघ होय. या विश्वचषकात भारताने दमदार कामगिरी केली. भारताने पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयरलँड संघाचा पराभव केला.
Vice-captain @mandhana_smriti starred with the bat & bagged the Player of the Match as #TeamIndia beat Ireland by 5️⃣ runs (via DLS) to seal a place in the #T20WorldCup semis! 👏 👏 #INDvIRE
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
Scorecard ▶️ https://t.co/rmyQRfmmLk pic.twitter.com/GftbVg1W4W
मंधानाची विस्फोटक खेळी -
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना हिने सुरुवातीपासूनच विस्फोटक फलंदाजी केली. अवघ्या 56 चेंडूत स्मृतीने 87 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 9 चौकार आणि तीन षटकांराचा समावेश आहे. मंधानाने पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मासोबत 62 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्माने 24 धावांची खेळी केली. त्याशिवाय जेमिमानं 19 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 13 धावांचं योगदान दिलं. स्मृती मंधानानं अखेरच्या षटकात आयरिश गोलंदाजांचा समाचार घेतला. स्मृतीच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर भारताने 155 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयरलँडने दमदार सुरुवात केली. आयरलँडने 8 षटकात दोन विकेट्सच्या मोबदल्यात 54 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर मैदानावर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला पाच विकेट्सने विजय दिला.
T20 WC 2023. India Women Won by 5 Run(s) (D/L Method) https://t.co/rmyQRfmmLk #INDvIRE #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा आजचा 150 वा टी 20 सामना होता. असा पराक्रम करणारी हरमनप्रीत पहिली महिला खेळाडू ठरली. बीसीसीआयने हरमनप्रीत कौर हिचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा :