(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Gavaskar: पंत की कार्तिक? टी-20 विश्वचषकात कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळावी? सुनील गावस्कर म्हणाले...
Sunil Gavaskar: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय.
Sunil Gavaskar: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, केएल राहुल (Kl Rahul) उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. विशेष म्हणजे, भारताच्या टी-20 संघात यष्टरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि ऋषभ पंतला (Rishabh Pant) या दोघांनाही संधी मिळाली आहे. परंतु, प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन्ही खेळवणं कठीण मानलं जातंय. दरम्यान, टी-20 विश्वचषकात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांपैकी कोणत्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जावं? अशा चर्चा सुरु असताना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी याबाबत आपलं मत मांडलंय.
सुनील गावस्कर यांच्या मते दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत दोघांनाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे. त्यांच्यामते, "पाचव्या क्रमांकावर किंवा हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर किंवा याचं उलटही होऊ शकतं. त्यानंतर दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं जाऊ शकतं. हार्दिक पांड्यासह भारताकडं चार गोलदाजांचं पर्याय असेल. तुम्ही जोखीम नाही घेणार तर, जिंकणार कसे? तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेन्टमध्ये जोखीम घेणं गरजेचं आहे. मग दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी कोणालाही संघात स्थान द्या."
राहुल द्रविड काय म्हणाले?
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं आपण कोणत्याही एका यष्टीरक्षकाला प्राधान्य देत नसल्याचं नमूद केल होतं. तसेच परिस्थिती आणि गरज पाहून खेळाडूला संघात स्थान दिलं जाऊ शकतंय. प्लेईंग इलेव्हनमधून दोघांपैकी एकाला वगळणं खूप कठीणं आहे. परंतु, आम्ही सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड करू.
ऋषभ पंतच्या तुलनेत दिनेश कार्तिकची दमदार कामगिरी
ऋषभ पंतला टी-20 फॉरमेटमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. तर, दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून त्यांच्या फलंदाजीत खूप सुधारणा केल्याचं पाहायला मिळतंय. त्यानं अनेक सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली आहे. आशिया चषकात दिनेश कार्तिकला फक्त एका सामन्यात संधी मिळाली होती. तर, उर्वरित सामन्यात ऋषभ पंतला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली. परंतु, तो फ्लॉप ठरला.
टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.
हे देखील वाचा-