Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Dharur News : ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे ( Mangesh Sasane ) यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Dharur News : ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे ( Mangesh Sasane ) यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲड. ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली.
अज्ञातांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, अज्ञातांनी गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचावर ही दगडफेक केली आणि पळ काढला आहे. यानंतर ॲड. ससाणे यांनी तात्काळ धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली. त्यावरून धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, कल्याण सिंडिकेट परिसरात धक्कादायक घटना
कल्याण सिंडिकेट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॅपिडो बाईक चालकाकडून एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कल्याण पश्चिममध्ये एका तरुणीने रॅपिड मोटरसायकल बुक केली. दरम्यान त्या मोटरसायकलवरून ती जिमला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सिंधुगेट परिसरामध्ये पोलीस लाईन आहे त्या पोलीस लाईनमध्ये बाईक वरून हा रॅपिडो चालक अंधारात घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्याजवळ मिरची स्प्रे ,चाकू असे हत्यार असल्याची माहिती तरुणीने दिली आहे. दरम्यान मुलीने स्वतःची सुटका करत पळ काढला. त्यांनतर स्थानिक नागरिकांनी रॅपिड चालकाला पकडून चांगलाच चोप दिलाय.
भंडाऱ्याचा वाळू घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजला; तत्कालीन SDM बालपांडे यांचं निलंबन
भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील वाळू घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात शासनाचा राजस्व बुडविण्यात आला. हा मुद्दा भंडाऱ्याचे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागपूर अधिवेशनात लावून धरला. याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना पवनीच्या वाळू घाटातून 65 कोटींच्या वाळूची अवैध वाहतूक करून शासनाचा महसूल बुडाल्याचा तलाठी यांनी अहवाल पवनी तहसील कार्यालयाला पाठविला. मात्र, पवनी तहसीलदार महेंद्र सोनवणे आणि भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांचं निलंबन करण्यात आलं असून यांच्यासह पवनीचे तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्यासह बालपांडे यांच्यावर वाळूचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देत असल्याची माहिती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली.
यासोबतच ज्या एजन्सीने वाळूचे अवैध उत्खनन करून घोटाळा केला त्या कंपनीची आणि भंडाऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह खनीकर्म अधिकाऱ्यांची ही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहे. यासोबत खणीकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी यात कसूर केला असल्याचं सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तहसीलदार सोनवणे हे सेवानिवृत्त झाले आहेत. या या कारवाईने भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या:























