एक्स्प्लोर

Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू

Ahilyanagar Leopard Attack : वडील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले, तर आजी गवताचा भारा घेऊन गोठ्यात गेली. नेमकी हिच संधी साधत बिबट्याने दरवाज्यात उभ्या असलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं.

अहिल्यानगर : राज्यभरात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आणि त्याच्या हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अहिल्यानगरमध्येही तशीच एक बातमी समोर आली असून बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडली. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात ही धक्कादायक घटना घडली.

शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दारात उभ्या असलेल्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याला जागेवरच ठार केलं. या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र होतं.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.

Ahilyanagar Leopard Attack : पारनेरमध्ये चार बिबटे जेरबंद

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. 2 डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पारनेर तालुक्यातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं.

Beed Leopard : बीडमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

बीड तालुक्यातील लिंबागणेश गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला. बिबट्याचा मुक्त संचार पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आह. मध्यरात्रीच्या सुमारास एका वाहन चालकाने लिंबागणेश परिसरात आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद केला. बिबट्या शेतशिवारात वावरत असतानाची दृश्यं आता समोर आली आहेत.

Nashik Leopard : नाशिकमध्ये ग्रामस्थांचा संताप

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी परिसरात बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर वनखात्याला बिबट्याला पकडण्यात यश आलं. मात्र त्या बिबट्याला विराणे वनहद्दीत सोडण्याच्या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला.

बिबट्याला विराणे परिसरात सोडल्यास नागरिकांच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत विराणे ग्रामस्थांनी खाकुर्डीसाक्री महामार्गावर रास्ता रोखून आंदोलन केलं. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget