एक्स्प्लोर

बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना

जुन्नर वन विभागाने पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत 68 बिबटे वन विभागाने पकडले आहेत. जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

पुणे : जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयाचा प्रादुर्भाव वाढल्याने, तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये दिले. त्यातून मोठ्या प्रमाणात पिंजरे करण्यात आले, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत 68 बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आज पर्यंत एवढ्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त करुन यात उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधोरेखित केले. 

बिबट्याच्या हल्ल्यात सन 2025-26 या वर्षात 5 नागरिकांचा मृत्यू

जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. बिबट हल्ल्यात सन 2025-26 या वर्षात 5 नागरिकांचा मृत्यू असून त्यांना 65 लाख रुपये, 5 नागरिक जखमी झाले असून त्यांना 2 लाख 18 हजार 964 रुपये,  1 हजार 657 जनावरांचा मत्यू झाले असून याकरिता 1 कोटी 61 लाख 16 हजार 889 रुपये  तसेच 17 हेक्टर 7 आर पीकांचे नुकसान झाले असून 9 लाख 79 हजार 900 रुपये असे मिळून 2 कोटी 38 लाख 15 हजार 753 रुपये  इतकी नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे. 

गावांमध्ये वन कर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन

जुन्नर वनविभागाकडून मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता  उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2020-2021 ते 2025-26 या कालावधीत 185 बिबट-बछडे पुनर्मिलन  करण्यात आले आहे. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये व शाळांमधून सुमारे 40 कार्यक्रम करण्यात आले असून व विषय प्राविण्य असणारे श्री सौमित्र यांचे मार्फत वेगवेगळ्या 50 गावांमध्ये विभागातील योजना तसेच बिबट जनजागृतीचे विशेष वर्ग ग्रामपंचायत पद अधिकारी यांचे सह घेण्यात आले आहेत.  बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतचे माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे.  बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण 400 सदस्य  कार्यरत आहेत. 

अतिसंवेदनशील गावांत 24 X 7 जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरुर),  आळे व नगदवाडी, जुन्न्र (ता. जुन्न्र), आणि  गावडेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी 'बिबट कृती दल' बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील व आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील 2 वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे. 

माहे मे 2024 पासून विभागीय कार्यालय जुन्नर येथे निंयत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक 1800 3033) स्थापन आले असून 24 X 7 कार्यरत आहे, यामाध्यमातून अतिसंवेदनशील क्षेत्राची माहिती गोळा करुन गस्तीबाबत सूचना देण्यात येते.  केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै 2024 मध्ये संघर्षक्षेत्रातील 10 बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना 410 सौर दिवे व 410 लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत. शिरुर व मंचर बनपरिक्षेत्रातील एकुण 50 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.  

वनविभागातील 233 अतिसंवेदनशील गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" घोषीत करण्यात आले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत 150 घरांना सौर उर्जा कुंपण बसविण्यात आले असून आणखीन 550 घरांना सदर कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. विभागात एकूण 400 पिंजरे कार्यान्वित आहेत. वनविभागामार्फत 400 आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना 3 हजार 300 नेक गार्डचे वाटप, 5 ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित आहेत. 

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन 4 बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे, असेही श्री. डुडी

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Embed widget