Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
उद्योजक यश बिर्ला यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी बिर्ला कुटुंबाला असलेला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा, शालेय जीवन, व्यवसाय, शिक्षण क्षेत्रातील काम, संस्कारांचं महत्त्व यावर यश बिर्ला यांनी संवाद साधला. शिक्षण हा व्यवसाय नसून सामाजिक सेवा असल्याचं यश बिर्लांनी म्हटलं. शिक्षणात संस्कार महत्त्वाचे असतात, असंही त्यांनी म्हटलं.
स्वातंत्र्यलढ्याच्या वारशाबाबत यश बिर्लांना काय वाटतं?
टाटा बिर्ला कवितेप्रमाणं वाटतं पण असं आहे, माझ्या पूर्वजांनी व्यवसाय केला पण त्याच्या पेक्षा जास्त देशभक्ती, सामाजिक सेवा, धर्म आणि जबाबदारी, भगवतगीतेतील सिद्धांत आहे, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करु नये, तोच सिद्धांत पूर्वजांनी राबवला. आम्ही व्यवसायात जी वाढ करु ते लोकांच्याबरोबर शेअर करु, असं यश बिर्ला यांनी म्हटलं. टाटा- बिर्ला यांचे व्यवसाय स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेले व्यवसाय होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलं होता त्यामुळं महत्त्व दिलं गेलं. माझ्या पूर्वजांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत काम केलं, यश बिर्ला म्हणाले.
उद्योजक होणं आमचं कर्म आहे. प्रमुख गोष्ट आहे की आपण जसे आहोत तसा विचार करण्यास आणि व्यक्त होताना संकोच करु नये. मला सांगितलं गेलं की होतं, कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून विमानात चढताना सूट घालून चढलं पाहिजे असं सांगितलं होतं. त्यांचं सांगणं योग्य होतं. मात्र, मला जिथं सुसह्य वाटेल, कम्फर्ट वाटेल असं राहण्याचा प्रयत्न केला. प्रमुख गोष्ट आपले संस्कार आहेत. आपलं ह्रदय, आपला आत्मा खरेपणानं राहील, असं यश बिर्लांनी म्हटलं.
All Shows
































