IND vs PAK, Playing 11 : पाकिस्तानविरुद्ध अंतिम 11 मध्ये पंत, चहल नाही, 6 फलंदाजांसह रोहित मैदानात, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
IND vs PAK, Playing 11 : भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्यात नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
🚨 Toss Update & Team News from MCG 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Pakistan. #T20WorldCup | #INDvPAK
— BCCI (@BCCI) October 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/1zahkeipvm
कसा आहे Pitch Report?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा विचार करता या स्टेडियमवर पहिल्या डावाची एकूण सरासरी 139 आहे तर दुसऱ्या डावाची एकूण सरासरी 127 आहे. स्टेडियमवर आतापर्यंत 18 T20 सामने झाले आहेत. स्टेडियमवर आतापर्यंतचा सर्वोच्च संघ 184-4 आहे. खेळपट्टी गोलंदाजांना चांगला बाऊन्स देत असल्याने वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होताना दिसतो. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत स्पिनर्सना अधिक फायदा होत नाही.
हे देखील वाचा-