IND vs PAK : मौका, मौका! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तापलं मेलबर्नचं वातावरण, पाहा फॅन्सचे व्हायरल VIDEO
IND vs PAK, T20 WC: आज भारत आणि पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगणार आहे. यासाठी तिथे उपस्थित फॅन्स कमालीचे उत्साही दिसत आहेत.
IND vs PAK, T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आज आमनेसामने मैदानात उतरणार असून या सामन्याने दोन्ही आपआपल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेची सुरुवात करत आहेत. दोघेही एकमेंकाचा दौरा करत नसल्याने अशा भव्य स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात, ज्यामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड उत्साह असतो. आजही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचून भारतीय चाहत्यांनी आपला उत्साह दाखवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहते मैदानाबाहेर गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत.
चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह
या महामुकाबल्याची बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा होती. बऱ्याच दिवसांपूर्वी सर्व तिकिट्सची विक्रीही झाली होती. आज फायनली सामन्याचा दिवस आला आहे आणि आज दोन्ही संघ मेलबर्नमध्ये आमनेसामने येतील. दरम्यान सामन्यासाठी त्याठिकाणी आलेले भारतीय चाहते ऑस्ट्रेलियामध्ये बॉलीवूड गाण्यांवर जोरदार थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये भारतीय चाहते हातात तिरंगा धरून आनंदाने नाचताना दिसत आहेत. भारतीय चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे.
पाहा VIDEO-
Cricket, songs, dance, fun - It's incredible at MCG. pic.twitter.com/QXXlpTRQDx
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2022
What an atmosphere already outside the MCG - fans enjoying at the Fanzone arena. pic.twitter.com/V6FqGAlgyF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2022
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.