IND vs SA: लाजिरवाण्या विक्रमापासून दूर राहण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; आज हरले तर...
South Africa tour of India 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.
South Africa tour of India 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह भारतीय संघ मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज रांचीच्या (Ranchi) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium Complex) खेळला जाणार आहे. या सामन्यात पराभूत झाल्यास भारतीय संघ मालिका गमावणार. याशिवाय, भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला जाईल.
भारतीय क्रिकेट संघानं आतापर्यंत एकूण 1012 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी 529 सामने जिंकले आहेत. तर, 433 सामन्यात भारताच्या पदरात निराशा पडली आहे. याचबरोबर 41 सामने अनिर्णित ठरले असून 9 सामने रद्द झाले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ कोणता?
क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेच्या संघानं सर्वाधिक 434 सामने गमावले आहेत. त्यानंतर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक पराभूत झालेल्या संघाच्या यादीत भारत 433 पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत वेस्ट इंडीजचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीजच्या संघानं आतापर्यंत 402 सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यास त्यांच्या नावावर सर्वाधिक एकदिवसीय सामने गमावणारा संघ म्हणून नोंद केली जाईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक 589 विजय मिळवले आहेत. याशिवाय भारतीय संघ 529 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघानं आतापर्यंत एकूण 498 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, आवेश खान, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी.
भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), जानेमन मलान, क्विंटन डि कॉक, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, रीजा हेन्ड्रिक्स, मार्को जानसेन, एनरिक नॉर्खिया, एन्डिले फेहलुक्वायो.
हे देखील वाचा-