एक्स्प्लोर

T20 World Cup 2022: टी- 20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा

ICC T20 World Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तान संघाची धुरा मोहम्मद नबी संभाळणार आहे.

ICC T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची धुरा मोहम्मद नबी संभाळणार आहे. तर, आशिया चषकात अफगाणिस्तानच्या संघाचा भाग असलेल्या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

ऑस्ट्रेलियात खेळला जाणाऱ्या आठव्या टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यांना 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने खेळले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलीय. दरम्यान, समीउल्लाह शिनवारी, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जजई, करीम जनत आणि नूर अहमद यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. हे सर्व खेळाडू आशिया चषकात अफगाणिस्तानच्या संघाचे भाग होते. यापैकी अफसर जजईचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलाय.

ट्वीट- 

नूर मलिकझाई काय म्हणाले?
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नूर मलिकजाई टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाबाबत बोलताना म्हणाले की, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. या स्पर्धेत आफगाणिस्तानचा संघ चांगली कामगिरी बजावेल,अशी अपेक्षा आहे."

टी-20 विश्वचषकासाठी अफगानिस्तानचा संघ:
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), रहमनुल्लाह गुरबज (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कैस अहमद, राशिद खान, सलीम सफी, उस्मान गनी. 
राखीव खेळाडू: अफसर जजई, शराफ़ुद्दीन अशरफ, रहमत शाह, गुलबदीन नायब. 

आस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget