Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु होती. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray)महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यंदा राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. आता शनिवारी (दि. 23) राज्यात मतमोजणी पार पडणार आहे. उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट होईल. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
सत्तेत राहणं पसंत करणार : प्रकाश आंबेडकर
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे", असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे. तर राज्यात महायुती की महाविकास आघाडी? नेमकं कोण सत्ता स्थापन करणार? याचे चित्र शनिवारी स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या