मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आता 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधीच चिपळून येथे मोठी घटना घडली आहे.
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) राज्यात 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांना कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून त्यांना 24 तास सीसीटीव्हींची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान, चिपळूमध्ये मात्र स्ट्राँग रुमच्या परिसरात मोठी घटना घडली आहे. येथे स्ट्राँग रुमच्या परिसरात फिरणाऱ्या संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजित पवार गटाचे हजारो कार्यकर्ते जमले
मिळालेल्या माहितीनुसार चिपळूणमध्ये स्ट्रॉन्ग रूमच्या परिसरात काही लोक फिरत होते. ही बाब समोर आल्यानतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने चिपळूण पोलीस स्थानकाच्या बाहेर एकत्र जमले होते.
दोन संशयितांचा पोलिसांकडून शोध चालू
हा प्रकार समोर येताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित तेथील स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य दोघे पळून घेले आहेत. या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलिस स्टेशनच्या आवारात महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सापडलेल्या कारमध्ये नेमकं काय?
स्ट्राँग रुमच्या परिसरात फिरत असलेल्या संशयितांची एक कार ताब्यात घेण्यात आली आहे. या कारमध्ये संशयितांचे सामान सापडले आहे. कारमध्ये एक काळ्या रंगाची छोटी बॅग आहे. या बॅगमध्ये पैसे आहेत. तसेच हँडग्लोजही दिसत आहेत. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
23 नोव्हेंबरला समजणार कोणाची सत्ता येणार?
दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मोजणी 23 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी चालू केली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत निवडणूक आयोगाकडून ही मतमोजणी केली जाईल. त्यानंतर 23 तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. चिपळूण मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत यादव आणि अजित पवार यांच्या पक्षाचे शेखर निकम यांच्यात लढत होणार आहे.
हेही वाचा :