(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AFG vs IRE : गतविजेता ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना रद्द होताच ग्रुप 1 मध्ये मोठा उलटफेर
T20 World Cup 2022 : ग्रुप 1 मध्ये आज रंगणारा अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ज्यानंतर दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आला आहे.
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत (T20 World Cup 2022) अनेक आश्चर्यकारक निर्णय लागताना दिसत आहेत. ग्रुप 1 मध्ये आज रंगणारा अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ज्यानंतर दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आल्यामुळे गुणतालिकेत दोन्ही संघाना फायदा झाला. पण यामुळेच गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ थेट शेवटच्या अर्थात सहाव्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून यातील एका सामन्यात न्यूझीलंडने त्यांना 89 धावांनी मोठी मात दिल आहे. तर श्रीलंकेविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून जिंकला आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. आयर्लंड संघाने बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिल्यानंतर गुरुवारी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अवघ्या एका धावेने झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली. दरम्यान आज अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात स्पर्धेतील 25 वा सामना रंगणार होता. पण मेलबर्नमध्ये सकाळपासूनच पाऊस असल्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. ज्यामुळे सामना थेट रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आला. दरम्यान या निर्णयापूर्वी ऑस्ट्रेलिया पाचव्या तर अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर होता. पण या सामन्याच्या निर्णयानंतर अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर पोहोचला असून ऑस्ट्रेलिया अखेरच्या अर्थात सहाव्या स्थानावर गेली आहे.
असा आहे ग्रुप 1 पॉईंट्स टेबल
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रन रेट |
न्यूझीलंड | 2 | 1 | 0 | 3 | 4.450 |
आयर्लंड | 3 | 1 | 1 | 3 | -1.170 |
श्रीलंका | 2 | 1 | 1 | 2 | 0.450 |
इंग्लंड | 2 | 1 | 1 | 2 | 0.239 |
अफगाणिस्तान | 3 | 0 | 1 | 2 | -0.620 |
ऑस्ट्रेलिया | 2 | 1 | 1 | 2 | -1.555 |
हे देखील वाचा-