T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप सेमीफायनलच्या शर्यतीत कोण-कोण? कोणत्या स्थानी कुठला संघ? पाहा पॉईंट्स टेबल
T20 WC 2022: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सध्या सुपर-12 राऊंडचे सामने सुरु आहेत. एकूण 6 संघाचे दोन ग्रुप अशाप्रकारे सामने खेळवले जात असून प्रत्येक ग्रुपमधून टॉप 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहेत.
T20 World Cup 2022 Points Table : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत दररोज काहीतरी नवीन उलटफेर पाहायला मिळत आहे. आयर्लंड संघाने बलाढ्य इंग्लंडला मात दिल्यानंतर नुकतीच झिम्बाब्वेने पाकिस्तानवर विजय मिळवला. यामुळे नेमके कोणते संघ सेमीफायनल गाठतील हे आताच सांगता येणार नाही. दरम्यान भारतीय संघ मात्र सलग दोन विजयांमुळे ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानी आहे. तर नेमका कोणता संघ कोणत्या स्थानी आहे ते पाहूया...
ग्रुप-1 पॉईंट्स टेबल : ग्रुप-1 मधून सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया टॉप-2 स्थानावर नसून न्यूझीलंड आणि आयर्लंडया संघानी अनुक्रमे पहिली दोन स्थानं मिळवली आहेत. यजमान आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ थेट शेवटच्या अर्थात सहाव्या स्थानी दिसत आहे. त्यामुळे एक रंगतदार स्थितीमध्ये ग्रुप 1 दिसून येत आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रन रेट |
न्यूझीलंड | 2 | 1 | 0 | 3 | 4.450 |
आयर्लंड | 3 | 1 | 1 | 3 | -1.170 |
श्रीलंका | 2 | 1 | 1 | 2 | 0.450 |
इंग्लंड | 2 | 1 | 1 | 2 | 0.239 |
अफगाणिस्तान | 2 | 0 | 1 | 2 | -0.620 |
ऑस्ट्रेलिया | 2 | 1 | 1 | 2 | -1.555 |
ग्रुप-2 पॉईंट्स टेबल : ग्रुप-2 चा विचार केल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पाकिस्तानचा संघही टॉपवर असेल असे वाटत होते पण सलग दोन सामने गमावल्यानने ते थेट पाचव्या स्थानावर आहेत. झिम्बाब्वे आणि बांग्लादेशचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रन रेट |
भारत | 2 | 2 | 0 | 4 | 1.425 |
दक्षिण आफ्रिका | 2 | 1 | 0 | 3 | 5.200 |
झिम्बाब्वे | 2 | 1 | 0 | 3 | 0.050 |
बांग्लादेश | 2 | 1 | 1 | 2 | -2.375 |
पाकिस्तान | 2 | 0 | 2 | 0 | -0.050 |
नेदरलँड | 2 | 0 | 2 | 0 | -1.625 |
टॉप-4 संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये
टी20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 फेरीतील संघ दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत. या फेरीत, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर पाच संघांविरुद्ध एक सामना खेळणार आहे. सर्व सामन्यानंतर प्रत्येक गटातील आघाडीवर असणारे 2 संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच सुपर-12 फेरीनंतर चार संघ उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये दाखल होतील आणि उर्वरित 8 संघांना मायदेशी परतावे लागणार आहे.