एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2019 : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी, व्यवस्थापनाचा निर्णय
टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. .
मुंबई : विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी दिली आहे. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी तयारीला लागणार आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.
भारतीय संघाने गेल्या 12 दिवसात तीन सामने खेळले आहेत.तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाने चार पैकी तीन सामने जिंकत 6 आणि रद्द झालेल्या सामन्याचा एक असे 7 अंक कमावत गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर कूच केली आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. याा सामन्यात रोहितने 140 धावांची दमदार खेळी उभारली होती. त्याला लोकेश राहुलने 57 धावांची तर विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी करत साथ दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement