एक्स्प्लोर
Advertisement
World Cup 2019 : पाकिस्तानचं शानदार बाऊन्सबॅक, इंग्लंडचा 14 धावांनी धुव्वा
पाकिस्तानने 50 षटकांत आठ बाद 348 धावा केल्या होत्या, मात्र इंग्लंडला 50 षटकात 9 विकेट गमावून 334 धावांचीच मजल मारता आली.
World Cup 2019: पाकिस्तानने इंग्लंडचा 14 धावांनी पराभव करुन विश्वचषकात मोठ्या दिमाखात बाऊन्सबॅक केलं. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 349 धावांचं लक्ष्य गाठण्यात इंग्लंडला अपयश आलं. साहेबांना 50 षटकात 9 विकेट गमावून 334 धावांचीच मजल मारता आली. इंग्लंडच्या ज्यो रुट आणि जोस बटलर यांनी झळकावलेली झुंजार शतकंही व्यर्थ गेली.
वेस्ट इंडिजने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या 105 धावांत खुर्दा उडवून सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला होता. पाकिस्तानचा संघ त्या पराभवातून उसळून पुन्हा उभा राहिला.
इंग्लंडच्या ज्यो रुट आणि जोस बटलर यांनी या सामन्यात झुंजार शतकं झळकावली. पण त्या दोघांच्या शतकांनंतरही इंग्लंडला विजयासाठीचं 349 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयश आलं. पाकिस्तानच्या वहाब रियाझने 48 व्या षटकांत दोन विकेट्स काढून इंग्लंडच्या पाठलागातली हवा काढून घेतली. इंग्लंडला 50 षटकांत नऊ बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली.
तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉय अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रुट आणि बेअरस्टोने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र बेअरस्टो 32 धावांवर बाद झाला. 118 धावांवर चार विकेट्स गमावल्यानंतर रुट आणि बटलर यांनी पाचव्या विकेट्ससाठी 130 धावांची भागिदारी रचली. रुट शतक पूर्ण करुन 107 धावांवर बाद झाला. रुट माघारी परतल्यानंतर बटलरने शतक पूर्ण केलं, मात्र तोही 103 धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून रियाझने 3, तर शादाब आणि आमिर यांनी प्रत्येकी 2, तर मलिक-हफीज यांनी 1-1 विकेट्स घेतल्या.
त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. या सामन्यात पाकिस्तानने 50 षटकांत आठ बाद 348 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर झमानने 82 धावांची भक्कम सलामी दिली. त्यानंतर बाबर आझमने 63 आणि मोहम्मद हफिझने 84, तर सरफराझ अहमदने 55 धावांची खेळी उभारुन पाकिस्तानच्या डावाला आणखी मजबुती दिली. पाकिस्तानच्या डावातल्या छोट्यामोठ्या भागिदाऱ्या त्यांच्या डावाचं वैशिष्ट्य ठरल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement