World Cup 2019 | टीम इंडियाची विश्वचषकातील विजयी परंपरा कायम, प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारली धूळ
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांच आव्हान देण्यात आला होतं.
लंडन : भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवली आहे. भारताने पाकिस्तानला विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला आहे.
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांच आव्हान देण्यात आला होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांच अशक्य आव्हान मिळालं होतं.
पाकिस्तानकडून फकर जमानने 62, बाबर आझमने 48 इमाथ वसिम 46 धावा केल्या. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
टीम इंडियाच्या मॅन्चेस्टरवरच्या विजयात सलामीच्या रोहित शर्माने रोहितनं मोलाचा वाटा उचलला. रोहितने या सामन्यात 140 धावांची दमदार खेळी उभारली. त्याच्या या खेळीला 14 चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. रोहितचं हे यंदाच्या विश्वचषकातलं दुसरं तर वन डे कारकीर्दीतलं 24 वं शतक ठरलं. रोहितची 140 धावांची खेळी ही भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या विश्वचषक लढतीतली सर्वोच्च खेळी ठरली.
धवनच्या दुखापतीमुळे लोकेश राहुलला आज पाकिस्तानविरुद्ध सलामीला बढती मिळाली. पण पहिल्यांदाच टीम इंडियासाठी सलामी देणाऱ्या रोहित आणि लोकेश राहुल जोडीला सुरुवातीला जम बसवणं अवघड गेलं. सुरुवातीला योग्य ताळमेळ नसल्यानं रोहित शर्मा धावबाद होता होता दोनदा बचावला. पण त्यानंतर या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेत 136 धावांची भागीदारी साकारली. लोकेश राहुलने 57 धावांची तर विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी केली.
आणखी वाचा