Womens Hockey WC 2022 : महिला हॉकी विश्वचषकात भारताचा शेवट गोड, जपानवर 3-1 ने विजय
Women's Hockey World Cup 2022 : यंदाच्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय संघ खास कामगिरी करु शकलेला नाही, पण नुकत्याच पार पडलेल्या जपान विरुद्धच्या सामन्यात भारत विजयी झाला.
Women's Hockey World Cup 2022 : महिला हॉकी विश्वचषकात (Womens Hockey World Cup 2022) भारतीय महिला खास कामगिरी (India Women's Hockey Team) करु शकल्या नाहीत. पण स्पर्धेत अखेरच्या सामन्यात जपानला 3-1 ने मात देत भारताने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या क्रॉस ओव्हर सामन्यात स्पेनने भारताला मात दिल्यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण पूल सामन्यात आज जपानला भारताने 3-1 ने नमवल्यामुळे भारताचा स्पर्धेतील शेवट किमान गोड झाला आहे.
सामन्यात भारतीय महिलांनी सुरुवातीपासून चांगली झुंज दिली. सर्वात आधी 19 व्या मिनिटाला जपानच्या असाई यू हिने गोल करत जपानला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर मात्र भारतीय महिलांनी आक्रमक कामगिरी सुरु केली. 29 व्या मिनिटाला नवनीत कौरने पहिला गोल केला. त्यानंतर 37 व्या मिनिटांला एक्का दीप ग्रेसने गोल करत सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर 44 व्या मिनिटाला पुन्हा एकदा नवनीत कौरने गोल करत भारताचा विजय पक्का केला. ज्यानंतर अखेरपर्यंत सामन्यात एकही गोल झाला नाही आणि भारत 3-1 ने जिंकला.
𝙏𝙧𝙪𝙚 𝙂𝙧𝙞𝙩 💪
— Hockey India (@TheHockeyIndia) July 13, 2022
And we finish our FIH Hockey Women's World Cup Spain and Netherlands 2022 campaign on a high note!
IND 3:1 JPN#HockeyIndia #IndiaKaGame #HWC2022 #HockeyEquals #HockeyInvites #ChakDeIndia #MatchDay @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/NIeNwMxlVq
भारतीय महिलांची निराशाजनक कामगिरी
महिला हॉकी विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी केली. भारताने केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. पूली बीमधील सामन्यात इंग्लंड आणि चीननं भारतासोबत 1-1 अशी बरोबरी साधली. तर, न्यूझीलंडविरुद्ध 4-3 आणि स्पेनविरुद्ध 1-0 नं भारताला स्वीकारावा लागला. ज्यानंतर आता जपानविरुद्ध केवळ भारत 3-1 ने विजयी झाला.
हे देखील वाचा-
- Women's Hockey World Cup 2022: स्पेनविरुद्ध पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर
- Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात
- IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय