IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून यावेळी आधी बुमराह-शमी जोडीने भेदक गोलंदाजी केली. ज्यानंतर रोहित-धवनजोडीने संयमी फलंदाजी केली.
IND vs ENG, 1st ODI, The Oval Stadium: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी आधी भारताने भेदक अशी गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. ज्यानंतर 111 धावांचं लक्ष्य केवळ 18.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केलं. हा विजय मिळवत मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे.
A clinical performance from #TeamIndia to beat England by 10 wickets 👏👏
— BCCI (@BCCI) July 12, 2022
We go 1️⃣-0️⃣ up in the series 👌
Scorecard ▶️ https://t.co/8E3nGmlNOh #ENGvIND pic.twitter.com/zpdix7PmTf
भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या वेगवान सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आणि अवघ्या 110 धावांत इंग्लंडला रोखलं. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.
रोहित-धवन जोडीने मिळवला विजय
111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना भारताने सुरुवातीपासून संयमी पण दमदार फलंदाजी कायम ठेवली. भारताची सर्वात अनुभवी जोडी रोहित-शिखर मैदानात असल्याने विजय मिळवणं आणखी सोपा झाला. रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली. रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला.
हे देखील वाचा-
- Mohammed Shami ODI Record : मोहम्मद शमीची कमाल, जलदगतीने 150 वन-डे विकेट पूर्ण करणाऱ्यां यादीत तिसऱ्या क्रमांकावर
- निवृत्तीनंतरही युवराज सिंहचा दबदबा, भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक; पाहा टॉप-5 फलंदाजांची यादी
- ENG vs IND: भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात ॲंडरसनचे सर्वाधिक विकेट्स, पाहा टॉप-5 गोलंदाजांची यादी