Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात
Legends League Cricket : नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीन निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनही या स्पर्धेत खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Legends League Cricket : क्रिकेट खेळासह आपल्या आवडत्या क्रिकेटर्सनाही चाहते मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. पण वयानुसार क्रिकेटपूट निवृत्ती घेत असल्याने अनेकजण आपल्या आवडच्या दिग्गज खेळाडूंचा खेळ मिस करत असतात. अशामध्ये लेजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) या स्पर्धेत माजी दिग्गज खेळाडू मैदानात उतरत असतात. अशामध्ये आता नुकतीच निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनही या स्पर्धेत खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम सुरु होणार आहे.
यावेळी भारताचा माजी स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि यूसुफ पठाण, तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन तसंच बरेच माजी दिग्गज क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. यावेळीच्या स्पर्धेत नव्याने सामिल होणाऱ्या इयॉन मॉर्गनकडे अनेकांचे लक्ष असेल. दोन वेगवेगळ्या देशांकडून शतक ठोकणारा मॉर्गन आणि आयर्लंडकडून खेळायचा, नंतर इंग्लंडकडून क्रिकेट खेळायला चालू केलं आणि इंग्लंडला पहिला-वहिला एकदिवसीय चषकही 2019 साली मिळवून दिला. दरम्यान आता मॉर्गन या लेजेंड्स लीगमध्ये कशी कामगिरी करेल, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष आहे. यावेळी लेजेंड्स लीगचे सह-संस्थापक आणि सीईओ रमन रहेजा यांनी, ''आम्ही संघात इयॉन मॉर्गनचं स्वागत करतो, त्याला आगामी हंगामात खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्याच्या येण्याने स्पर्धा आणखी रोमहर्षक होईल.'' असंही रहेजा म्हणाले.
मॉर्गनची क्रिकेट कारकिर्द
2006 साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणाऱ्या मॉर्गनने 16 वर्षानंतर काही दिवसांपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. आधी 2006 ते 2009 आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला. 35 वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यात 13 शतकांसह 6 हजार 957 धावा ठोकल्या. तर आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून 7 हजार 701 धावा 14 शतकांसह केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 126 सामन्यात इंग्लंडचं नेतृत्त्व करत 76 सामने संघाला जिंकवून दिले, त्यामुळे 5.25 हा त्याची सामने जिंकण्याची सरासरी ठरली. यामध्ये 2019 साली त्याने संघाला मिळवून दिलेला पहिला वहिला एकदिवसीय चषक खास ठरला.
हे देखील वाचा-