Women's Hockey World Cup 2022: स्पेनविरुद्ध पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर
Women's Hockey World Cup 2022: महिला हॉकी विश्वचषकातील क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय संघाला (India Women's Hockey Team) यजमान स्पेनकडून पराभव पत्करावा लागलाय.
![Women's Hockey World Cup 2022: स्पेनविरुद्ध पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर Women's Hockey World Cup 2022: India Women's Hockey Team campaign ends with 0-1 loss to ESP Women's Hockey World Cup 2022: स्पेनविरुद्ध पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/11/78dd228df6f81714e85f0b238b14ef921657514373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Women's Hockey World Cup 2022: महिला हॉकी विश्वचषकातील क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय संघाला (India Women's Hockey Team) यजमान स्पेनकडून पराभव पत्करावा लागलाय. या पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाचं महिला हॉकी विश्वचषक 2022 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पेननं सामन्याच्या अवघ्या 3 मिनिटे आधी गोल करून भारतीयांच्या आशेवर पाणी फेरलं. महत्वाचं म्हणजे, भारतीय महिला संघाला पूल बी मधील तिन्ही सामन्यात एकही विजय मिळवता आला नाही. या स्पर्धेतील भारताचे सुरुवातीचे दोन्ही सामने अनिर्णित ठरले. त्यानंतर अखेरच्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं.
अखेरच्या तीन मिनिटांत स्पेनचा गोल
स्पेनविरुद्धच्या क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय महिला संघानं सुरुवातीला दमदार खेळ दाखवला. दोन्ही संघांमध्ये तीन क्वार्टरपर्यंत बरोबरीची स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु, चौथ्या कार्टरमध्ये आक्रमकता दाखवत स्पेननं आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर स्पेननं भारताविरुद्ध सातत्यानं गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरत होते. मात्र, या सामन्यातील अखेरच्या तीन मिनिटात स्पेननं गोल करत भारताचा 1-0 असा पराभव केला.
भारतीय महिलांची निराशाजनक कामगिरी
महिला हॉकी विश्वचषका 2022 मध्ये भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. भारताला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही. पूली बी सामन्यात इंग्लंड आणि चीननं भारतासोबत 1-1 अशी बरोबरी साधली. तर, न्यूझीलंडविरुद्ध 4-3 आणि स्पेनविरुद्ध 1-0 नं भारताला स्वीकारावा लागला.
आता 9व्या ते 16व्या स्थानासाठी लढत
भारतीय संघ आता विश्वचषकात 9व्या ते 16व्या स्थानासाठी इतर संघांशी भिडणार आहे. सोमवारी त्याचा सामना कॅनडाशी होणार आहे. तीनही सामने गमावून कॅनडा पूल-सीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-
- Novak Djokovic: नोवाक जोकोनिचची विक्रमी घौडदौड; रॉजर फेडररचा एका मागून एक मोडतोय विक्रम!
- ENG vs IND, 3rd T20 : सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत
- ENG vs IND: सूर्या चमकला! आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वोच्च धावा करणारा दुसरा भारतीय; रोहित शर्मा, केएल राहुलच्या पंक्तीत स्थान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)