एक्स्प्लोर

ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण?

विराट कोहलीनं 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यातलं अपयश 2018 साली धुवून काढलं. टीम इंडियाच्या कर्णधारानं चार कसोटी सामन्यांमधल्या आठ डावांमध्ये 544 धावांचा डोंगर उभारला.

मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधली ओव्हलची पाचवी कसोटी आता तोंडावर आली आहे. पण टीम इंडियानं चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही गमावून आपली अब्रू गमावली. आता इंग्लंड दौऱ्यातली उरलीसुरली लाज राखायची, तर भारताला पाचवी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला आणखी एका भरवशाच्या फलंदाजाची साथ हवी आहे. विराट कोहलीनं 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यातलं अपयश 2018 साली धुवून काढलं. टीम इंडियाच्या कर्णधारानं चार कसोटी सामन्यांमधल्या आठ डावांमध्ये 544 धावांचा डोंगर उभारला. पण दुर्दैव विराटच्या या सातत्याला दुसऱ्या टोकाकडून साथच लाभली नाही. आणि इंग्लंडनं साऊदम्प्टन कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली. विराट कोहली हा आजच्या जमान्यातला सर्वोत्तम फलंदाज आहे, यात कुणाच्याही मनात शंका नाही. पण क्रिकेटसारख्या सांघिक खेळात एकटा सचिन तेंडुलकर किंवा एकटा विराट कोहली तुम्हाला कधीच जिंकून देऊन शकत नाही. इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या चार कसोटी सामन्यांत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनंही धावा केल्या आहेत. पण जिंकायचं म्हटलं की, टीम इंडिया म्हणजे वन मॅन शो हे समीकरण ठरलेलं आहे. त्यात सलामीच्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांची तर धावांच्या नावानं बोंबच झाली. कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवन भारतीय संघाचं ओझं एकट्याच्या खांद्यावरून वाहून नेऊ शकत नाही, यावरही पुन्हा शिक्कामोर्तब झालं. या परिस्थितीत टीम इंडियासमोर सलामीचा उदयोन्मुख फलंदाज पृथ्वी शॉकडे वळण्याशिवाय खरोखरच पर्याय दिसत नाही. पृथ्वीनं गेल्या दीड वर्षात 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीनं 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 19 सामन्यांत 651 धावा जमा आहेत. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी आहे 34.36. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टीन विश्वचषकावरही यंदा आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पृथ्वी थोरामोठ्यांच्या अगदी खांद्याला खांदा भिडवून खेळला. पृथ्वीची ताजी कामगिरी लक्षात घेता, लोकेश राहुलऐवजी त्याला पाचव्या कसोटीसाठी संधी मिळण्याची चिन्हं आहेत. पण पृथ्वीचं वय जेमतेम 18-19 वर्षांचं वय लक्षात घेता, त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्यासाठी पुरेशी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. पृथ्वी शॉसारखा फलंदाज हे भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. आणि ते भविष्य जपण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची खदखद, वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह 
वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकाचे पाकिस्तानला हादरे, माजी क्रिकेटपटूनं थेट बेबी बॉसच्या वयाचा मुद्दा काढला
Shoaib Akhtar On Vaibhav Sooryavanshi: बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
Vaibhav Sooryavanshi: आता तू माझी प्रेरणा..., वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीवर सूर्या खूश, सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Embed widget