Pakistan T20 World Cup 2026 : नक्वी नाराज, पाकिस्तान बोर्डात खळबळ! बाबर आझमला गुडबाय, तर सलमान आगा कर्णधारपदावरून होणार OUT?
Pakistan T20 World Cup 2026 : श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या लीग सामन्यात विजय मिळवूनही पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकातील प्रवास संपला आणि त्यानंतर संघावर चौफेर टीका सुरू झाली आहे.

Pakistan T20 World Cup 2026 : श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या लीग सामन्यात विजय मिळवूनही पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकातील प्रवास संपला आणि त्यानंतर संघावर चौफेर टीका सुरू झाली आहे. कामगिरीबाबत चाहत्यांसह माजी खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली असून कर्णधार सलमान आगाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पूर्वीच्या निर्णयांची पार्श्वभूमी पाहता, विश्वचषकानंतर टी-20 संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्वी नाराज, मोठे निर्णय घेणार?
पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी संघाच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. निवड समिती, टीम मॅनेजमेंट आणि बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी संघ पूर्ण तयारीत असल्याचे आणि विश्वचषकात दमदार कामगिरी करेल असा विश्वास दिला होता. मात्र प्रत्यक्षात अपेक्षाभंग झाल्याने नक्वी संतप्त असल्याचे समजते.
सलमान आगाची होणार कर्णधारपदावरून हकालपट्टी?
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान अली आगाला टी-20 कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय विश्वचषकानंतर जाहीर होऊ शकतो. तसेच मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि निवड समितीशी काही वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्यावर चर्चा होणार आहे. यात बाबर आझम, उस्मान खान यांच्यासह आणखी काही खेळाडूंच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा पडण्याची शक्यता आहे.
पुढचा कर्णधार कोण?
नव्या कर्णधारासाठी शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी ही नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. विश्वचषकापूर्वीच माइक हेसन यांनी संघात तरुण खेळाडूंना संधी देण्याची गरज असल्याचे नक्वींना सुचवले होते. आधुनिक टी20 क्रिकेटच्या गरजांनुसार संघाची पुनर्रचना करण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
बाबरच्या टी-20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह
145 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले बाबर आझमचे भवितव्यही सध्या अनिश्चित आहे. उर्वरित सामन्यांत विशेषतः श्रीलंकेविरुद्ध आणि संभाव्य नॉकआउट टप्प्यात त्यांनी प्रभावी कामगिरी केली नाही, तर त्यांची टी20 कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिंकल्यानंतरही पाकिस्तान हरला
दासुन शनाकाच्या अर्धशतकांच्या मदतीने श्रीलंकेने पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग केले. शनिवारी पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सुपर-8 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. साहिबजादा फरहानच्या अंकगणितीय आणि फखर जमानच्या अर्धशतकाच्या मदतीने पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित षटकांत सहा गडी गमावून 207 धावा केल्या. पण, संघाने सामना गमावला. पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी तो उपांत्य फेरीत पराभूत झाला आणि टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. त्याच वेळी, इंग्लंड आणि न्यूझीलंडने ग्रुप-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली.
हे ही वाचा -





















