एक्स्प्लोर
सारा आणि अर्जुन ट्विटरवर नाहीत, सचिनचं स्पष्टीकरण
‘माझी दोन्ही मुलं, सारा आणि अर्जुन ट्विटरवर नाहीत. हे फेक अकाऊंट काढण्याची विनंती ट्विटरला केली आहे’, असं स्पष्टीकरण सचिनने दिलं आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या फेक ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र ‘माझी दोन्ही मुलं, सारा आणि अर्जुन ट्विटरवर नाहीत. हे फेक अकाऊंट काढण्याची विनंती ट्विटरला केली आहे’, असं स्पष्टीकरण सचिनने दिलं आहे.
या तोतयागिरीमुळे गैरसमज निर्माण होऊन आपल्याला त्रास होतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही सचिनने केली आहे.
‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही’ असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं.
विजय मल्ल्याने शरद पवारांचं नाव घेतल्याच्या चर्चांवरुन हे ट्वीट करण्यात आल्याचा अंदाज आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली आहे. हे फेक अकाऊंट कोणाचं आहे, ते शोधून तक्रार करावी, असंही आव्हाडांनी सांगितलं आहे.
फेक अकाऊंटवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आव्हाडांनी दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली आहे.
संबंधित बातमी : सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट, शरद पवारांवर टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement