एक्स्प्लोर
चाळीशीतल्या वसीम जाफरचा नवा विक्रम!
विदर्भाच्या वासिम जाफरनं इराणी करंडकाच्या इतिहासातला वैयक्तिक उच्चांकाचा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे.
नागपूर : विदर्भाच्या वासिम जाफरनं इराणी करंडकाच्या इतिहासातला वैयक्तिक उच्चांकाचा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. विदर्भ आणि शेष भारत संघांमधला इराणी करंडकाचा सामना नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर सुरु आहे.
या सामन्यात विदर्भानं दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद ५९८ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी जाफर २८५ धावांवर खेळत होता. त्यानं ही खेळी उभारुन, तामिळनाडूच्या मुरली विजयच्या नावावरचा २६६ धावांचा विक्रमही मोडीत काढला.
जाफरनं वयाच्या चाळीसाव्या वर्षी बजावलेली ही कामगिरी त्यानं राखलेल्या फिटनेसची साक्ष देत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्येही तब्बल 18,000 धावा पूर्ण केल्या आहेत. 18000 धावा करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. 242 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 53 शतकं आणि 86 अर्धशतकांच्या जोरावर हा विक्रम केला आहे.
वसीम जाफरच्या आधी सुनील गावसकर (25,834 धावा), सचिन तेंडुलकर (25,396 धावा), राहुल द्रविड (23,794 धावा), व्हीव्हीएस लक्ष्मण (19,730 धावा) आणि विजय हजारे (18,740 धावा) या सर्व खेळाडूंनी 18,000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याच दिग्गज खेळाडूंच्या यादीत वसीम जाफरलाह स्थान मिळालं आहे.
जाफरने भारतासाठी 31 कसोटी सामन्यात 1944 धावा केल्या आहेत. त्याने आपली शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी दहा वर्षापूर्वी एप्रिल 2008 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध कानपूरमध्ये खेळली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement