एक्स्प्लोर
वीरेंद्र सेहवागची नवी इनिंग, अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

मुंबई : तूफान फलंदाजी, 'बोलं'दाजी अर्थात कॉमेंट्री आणि ट्विटरवर चौफेर फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून वीरु अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत असल्याची माहिती आहे. पुढच्या आठवड्यापासून वीरुची वेब सीरिज ऑन एअर जाणार आहे. सेहवाग यात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. त्यामुळे वीरुच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी असेल. मैदानावर षटकार आणि चौकार फटकावणाऱ्या सेहवागची समालोचनाच्या क्षेत्रातही तुफान कामगिरी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ट्विटरच्या पिचवरही विरुने शानदार इनिंग सुरु केली आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करत सेहवागचे उपहासात्मक ट्वीट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे वीरुची वेब सीरिज कशी असेल, याकडे तमाम चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























