एक्स्प्लोर
'मॅन ऑफ द सीरिज' आर. अश्विनवर सेहवागचं मजेशीर ट्वीट
मुंबई: टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या आपल्या ट्विटरवरील फटकेबाजीमुळे सोशल मीडियात बराच चर्चेत आहे. यावेळी सेहवागने 'मॅन ऑफ द सीरिज' ठरलेल्या आर. अश्विनवर मजेशीर ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बरंच व्हायरल होत आहे.
इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर. अश्विनने न्यूझीलंडचे 13 गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 27 विकेट घेतल्या. त्याच्या याच कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर वीरुनं आपल्या खास शैलीत त्याचं अभिनंदन केलं.
सेहवागने ट्वीट केलं की, 'सातव्यांदा मॅन ऑफ द सीरिजसाठी आर. अश्विनला शुभेच्छा, "फक्त लग्न झालेल्या पुरुषालाच घरी लवकर जाण्याचं महत्त्व समजू शकतं. #FamilyTime.’’Congrats @ashwinravi99 for an incredible 7th Man of the series. Only a married man can understand d urgency of going home early.#FamilyTime
— Virender Sehwag (@virendersehwag) October 11, 2016
@ashwinravi99 @virendersehwag hahaha I didn't do much :) — Prithi Ashwin (@prithinarayanan) October 11, 2016सेहवागच्या या मजेशीर ट्वीटवर आर. अश्विनची पत्नी प्रीती आणि सेहवगाची पत्नी आरतीने देखील ट्वीट केलं आहे.
भल्याभल्या फलंदाजांची विकेट काढणाऱ्या अश्विनची मात्र सेहवागने या मजेशीर ट्वीटने विकेट काढली..@prithinarayanan Neither did I. Both in a hurry as always @ashwinravi99@virendersehwag
— Aarti Sehwag (@AartiSehwag) October 11, 2016
@virendersehwag lol..viru pa — Ashwin Ravichandran (@ashwinravi99) October 11, 2016दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 321 धावांनी दणदणीत पराभव केला. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारताने मालिकेत 3-0ने विजय मिळवून न्यूझीलंडला व्हॉईट वॉश दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement