एक्स्प्लोर
'जिओ मेरे लाला...', सचिनच्या ट्वीटला सेहवागचं भन्नाट उत्तर!
मुंबई: कोलकातातील ईडन गार्डनमध्ये इंडिया वि. न्यूझीलंडमध्ये खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतानं न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवून 2-0 नं मालिका खिशात टाकली.
या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टीम इंडियावर ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. 'टीम इंडियाचा पुन्हा एकदा एक शानदार विजय आणि टेस्ट रॅकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!'
सचिनच्या या ट्वीटनंतर टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनंही ट्विटरवर जोरदार बॅटिंग केली. फलंदाजीसाठी हे दोन्ही फलंदाज अनेकदा सलामीला आले आहेत. अनेक सामन्यात त्यांनी भारताला विजयही मिळवून दिला आहे. सध्या वीरेंद्र सेहवाग समालोचक म्हणून आपली भूमिका बजावत आहे. सचिनच्या ट्विटनंतर सेहवागनंही ट्वीट केलं. "ओह देवा... कधी-कधी कमेंटेटर्सचं देखील कौतुक करा, थोडी प्रेरणा मिळेल"A spectacular victory by Team INDIA & many congratulations on regaining the no 1 position in the world test cricket!! #INDvNZ
— sachin tendulkar (@sachin_rt) October 4, 2016
Oh God ji, kabhi kabhi Commentators ko bhi encourage kar diya kijiye. Thoda Motivation mil jaayega . https://t.co/KOzAUL5gWi — Virender Sehwag (@virendersehwag) October 4, 2016यानंतर सचिननं सहवागला ट्वीट करुन उत्तर दिलं. 'जिओ मेरे लाला, तथास्तु!!!'
यानंतरही सेहवाग मस्तीच्या मू़डमध्ये दिसून आला. या ट्वीटनंतर त्यानं पुन्हा ट्विट केलं. 'आशीर्वाद देतानाही देवा तुम्ही आपल्या आयपीएल संघाच्या मालकाच्या ब्रॅण्डचाही उल्लेख न विसरता करता... खरंच जग हलवून टाकता तुम्ही'Jiyo mere Lala....????????????Tathaaaastuuuuu!!!???????? https://t.co/whyq1pluGn
— sachin tendulkar (@sachin_rt) October 4, 2016
???? Aashirwad me bhi God ji , apni IPL team ke Maalik ke brand ka zikr karna nahi bhoolte. Sahi me, Duniya hila dete hain aap God ji https://t.co/RA5eSbOpX7 — Virender Sehwag (@virendersehwag) October 5, 2016त्यानंतर पुन्हा एकदा सचिननं त्याला ट्वीटवरुन उत्तर दिलं. 'ही तर ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत आहे. तुझी विचार करण्याची पद्धत वेगळी आणि माझी स्पेलिंगची पद्धत वेगळी...'
Woh to apni apni soch ki baat hai. ????Tumhari soch ki alag, meri spelling ki alag …???? https://t.co/BJMfmPsHH6
— sachin tendulkar (@sachin_rt) October 5, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement