एक्स्प्लोर
Advertisement
जबरदस्त फॉर्मात असलेला कोहली 'या' विक्रमापासून दूरच!
भारताचा कर्णधार विराट कोहलीची तुलना आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागली आहे. पण असं असलं तरीही विराटला एक विक्रम अजूनही मोडता आलेला नाही.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या भलत्याच फॉर्मात आहे. नुकतीच त्यानं 50 आंतरराष्ट्रीय शतकंही पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागली आहे. पण असं असलं तरीही विराटला एक विक्रम अजूनही मोडता आलेला नाही. आतापर्यत विराट एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर करु शकलेला नाही.
कोहली 2017 मध्ये आतापर्यंत 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामध्ये आठ कसोटी, 26 वनडे आणि दहा टी-20 सामन्यांचा समावेश आहे. याआधी कोहली कधीही एका वर्षात एवढे सामने खेळला नव्हता. 2011 आणि 2013 मध्ये तो 43-43 सामने खेळला होता. जर कोहली श्रीलंकेविरुद्ध उर्वरित दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळला तरीही तो एका वर्षातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकत नाही. कारण की त्याची संख्या 52 होते. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक म्हणजेच 53 सामने खेळण्याचा विक्रम राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद युसूफ यांच्या नावावर जमा आहे. या तिघांनीही वेगवेगळ्या कॅलेंडर वर्षात 53 सामने खेळण्याची किमया केली आहे.
द्रविडनं 1999 साली 53 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तेव्हा टी-20 देखील अस्तित्वात नव्हतं. त्यावेळी द्रविड 43 वनडे सामने आणि 10 कसोटी सामने खेळला होता. तर 2007 साली धोनीनं आठ कसोटी, 37 वनडे आणि 8 टी-20 सामने खेळला होता.
आजवर कोहलीनं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे हा विक्रम देखील त्याला नक्कीच खुणावत असणार. त्यामुळे येत्या काही वर्षात कोहली हा विक्रम मोडणार का याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
विराट भारी, की सचिन लय भारी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement