एक्स्प्लोर
रोहितने अनुष्काला सल्ला दिला, तर विराट म्हणाला...
विराट आणि अनुष्काचं 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये लग्न झालं होतं. विरुष्का सध्या हनिमूनला गेले आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने हीट मॅन रोहित शर्माच्या ट्वीटचं मजेशीर उत्तर दिलं आहे. रोहित शर्माने 12 डिसेंबरला विराट आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
"तुम्हा दोघांचं अभिनंदन. विराट मी तुझ्यासोबत हसबंड हॅण्डबुक शेअर करेन. अनुष्का शर्मा, आडनाव कायम ठेव," असं रोहितने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
यावर अनुष्काने आधीच उत्तर दिलं होतं. कदाचित विराटला उशिराच या ट्वीटची माहिती मिळाली. रोहित शर्माची मस्करी करताना, डबल सेंचुरीचं हॅण्डबुक शेअर करण्यास सांगितलं होतं.
'हाहा थँक्स रोहित, आणि प्लीज द्विशतकाचं हॅण्डबुकही शेअर कर,' असं ट्वीट विराटने केलं होतं.
दुसरीकडे अनुष्का शर्माने रोहितच्या ट्वीटचं दोन दिवसांनंतर उत्तर दिलं होतं. 'हाहाहा थँक्यू रोहित! आणि शानदार खेळीसाठी तुला शुभेच्छा,' असं ट्वीट तिने केलं होतं.Haha thanks Rohit, and please do share the Double Hundred Handbook as well. ????
— Virat Kohli (@imVkohli) December 19, 2017
Hahaha thanks Rohit! ???????? And congratulations on your splendid innings ???? https://t.co/xeo9whyx8T — Anushka Sharma (@AnushkaSharma) December 13, 2017विराट आणि अनुष्काचं 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये लग्न झालं होतं. विरुष्का सध्या हनिमूनला गेले आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघांचं नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माने, मागील आठवड्यात बुधवारी श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावांची विक्रमी खेळी केली. मोहालीमधील या सामन्यात रोहित मॅन ऑफ द मॅच ठरला. श्रीलंकेविरुद्धचा पहिला वन डे सामना गमावल्यानंतर पुढील दोन सामने सलग जिंकत मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. आता दोन्ही संघांमध्ये ट्वेण्ट-20 मालिका होणार असून त्याचं नेतृत्त्वही रोहितच करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement