एक्स्प्लोर
कसं खेळायचं, हे धोनीला सांगण्याची गरज नाही : कोहली
जमैका : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज 36 वा जन्मदिवस आहे. धोनीला त्याच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. तर टीम इंडियाने आणि कर्णधार विराट कोहलीनेही त्याला खास गिफ्ट दिलं.
जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका 3-1 ने जिंकून टीम इंडियाने माहीला खास गिफ्ट दिलं. सामना संपल्यानंतर कोहलीने धोनीच्या टीकाकारांनाही सडेतोड उत्तर दिलं.
बर्थ डे स्पेशल: धोनीचे 6 जबरदस्त निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली. याच सामन्यात टीम इंडियाला 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. धोनीने या सामन्यात कारकीर्दीतीलं सर्वात संथ अर्धशतक नावावर करत 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.तेव्हा पवार म्हणाले होते, सचिनमुळेच धोनी कर्णधार!
कसं खेळायचं, हे धोनीला सांगण्याची गरज नाही. तो चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत काय करायचं आणि खेळ कसा सुरु ठेवायचा हे त्याला सांगण्याची गरज नाही, असं विराट कोहलीने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement