एक्स्प्लोर
पाकिस्तानात विराट कोहली पिझ्झा बनवतोय? व्हिडीओ व्हायरल
![पाकिस्तानात विराट कोहली पिझ्झा बनवतोय? व्हिडीओ व्हायरल Virat Kohli Duplicate Found At Pizza Outlet In Pakistan पाकिस्तानात विराट कोहली पिझ्झा बनवतोय? व्हिडीओ व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/14145612/Virat_Duplicate.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या अफलातून खेळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने विरोधकांना त्याच्या खेळावर प्रेम करायला शिकवलं. तर दुसरीकडे तो लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहतो. गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ आहे पाकिस्तानच्या कराचीमधील डॉमिनोज पिझ्झा आऊटलेटचा.
या व्हिडीओमध्ये विराट कोहली पाकिस्तानमधील डॉमिनोजमध्ये पिझ्झा बनवत असल्याचं दिसत आहे. आता तुम्ही विचार कराल की विराटवर पिझ्झा बनवण्याची वेळ का यावी आणि तीही पाकिस्तानमध्ये?
तर कराचीच्या 'शहीद ए मिल्लत' या पिझ्झा स्टोअरमध्ये काम करणारा व्यक्ती हुबेहुब विराट कोहलीसारखा दिसतो.
विराट कोहलीच्या या डुप्लिकेटचा व्हिडीओ 'जस्ट पाकिस्तानी थिंग्स' नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यात आला होता. जो आता तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)