एक्स्प्लोर
VIDEO : शमीच्या मुलीसोबत विराट कोहलीचा डान्स
पार्टीत डान्स फ्लोअरवर विराट कोहली बेभान होऊन नाचत असताना काळा फ्रॉक घातेलली क्यूट आयरा तिथे आली. तिला पाहताच कोहलीला तिच्यासोबत डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
मुंबई : मैदानावर तडाखेबाज फलंदाजी करणारा विराट कोहली ऑफ फील्डही तितक्याच जोशात मजा-मस्ती करताना दिसतो. श्रीलंकेविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केलं. या पार्टीमध्ये कोहलीने क्रिकेटर मोहम्मद शमीच्या मुलीसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला आहे.
मोहम्मद शमीची दोन वर्षांची मुलगी आयरा टीम इंडियाच्या सक्सेस पार्टीला आली होती. पार्टीत डान्स फ्लोअरवर विराट कोहली बेभान होऊन नाचत असताना काळा फ्रॉक घातेलली क्यूट आयरा तिथे आली. तिला पाहताच कोहलीला तिच्यासोबत डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
गाण्यावर ताल धरत विराट आणि आयराने गिरक्या घेत डान्स केला. लेकीचा व्हिडिओ काढण्याची संधी शमीनेही दवडली नाही. लागलीच त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअरही केला. दोघांच्या या क्यूट डान्सला चाहत्यांनी भरभरुन दाद दिली आहे.
https://twitter.com/MdShami11/status/902191146578853888
कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून भारताने श्रीलंका दौऱ्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराने पाच विकेट्स घेऊन, तर रोहित शर्माने नाबाद शतक ठोकून भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement