एक्स्प्लोर
विराटकडून अनुष्काला 'खास' बर्थ डे गिफ्ट!
'अनुष्का सामना पाहण्यासाठी आली होती. त्यामुळे मला हा सामना जिंकून तिचा बर्थ डे आणखी खास पद्धतीने साजरा करायचा होता.'
बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने काल (मंगळवार) मुंबई विरुद्धच्या सामना जिंकून पत्नी अनुष्का शर्माला खास बर्थ डे गिफ्ट दिलं. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने काल आपला 30वा वाढदिवस साजरा केला.
सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, 'अनुष्का सामना पाहण्यासाठी आली होती. त्यामुळे मला हा सामना जिंकून तिचा बर्थ डे आणखी खास पद्धतीने साजरा करायचा होता.'
दरम्यान, बर्थ डे सेलिब्रेशननंतर अनुष्काने इंस्टाग्रामवर एक खास फोटोही शेअर केला. 'जगातील सर्वात बेस्ट, प्रेमळ, शूर माणसासोबत बर्थ डे सेलिब्रेशन. लव्ह यू...' असं म्हणत अनुष्का हा फोटो शेअर केला.
अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला होता. लग्नानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी विराटने कोणतीही कसर ठेवलेली नसेल. बायकोचा फोटो शेअर करताना विराटने लिहिलं आहे की, "हॅप्पी बर्थ डे लव्ह. मला माहित असलेली अतिशय सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती, लव्ह यू" विराट आणि अनुष्काने मागील वर्षी 11 डिसेंबरला इटलीमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर दिल्ली आणि मग मुंबईत लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन दिलं होतं.
दरम्यान, कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी विजय मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement