एक्स्प्लोर
विश्वविजेत्या अंडर-19 टीम इंडियाच्या शिलेदारांचा राजभवनात सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई : अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांना राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ, आदित्य ठाकरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा राजभवनात सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. अंतिम स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारतीय युवा संघाने चौथ्यांदा विश्वकरंडक पटकावला. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट संघ भावनेने खेळ करताना भारतीय खेळाडूंनी दाखवलेलं सातत्य कौतुकास्पद असून, भारतीय क्रिकेटसाठी ते आशादायी आहे, असं राज्यपाल म्हणाले. पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने चौथ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. यापूर्वी भारताने विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि उन्मुक्त चंद यांच्या नेतृत्त्वात विश्वचषक जिंकला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























