एक्स्प्लोर
कसोटी क्रिकेटमध्ये उमेश यादवच्या 'शंभर नंबरी' विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स गाठणारा उमेश यादव हा भारताचा आठवा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

बंगळुरु : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने कसोटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्सचा टप्पा पार केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स गाठणारा उमेश यादव हा भारताचा आठवा वेगवान गोलंदाज ठरला आहे. बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात रहमत शाहला बाद करत उमेशने हा टप्पा ओलांडला. 30 वर्षांच्या उमेश यादवनं 37 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या बंगळुरु कसोटीत उमेश यादवनं दोन्ही डावात मिळून 44 धावांत 4 फलंदाजांना माघारी धाडलं. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत विक्रमी विजय साजरा केला. धवन आणि मुरली विजयच्या शतकी खेळींमुळे भारतानं पहिल्या डावात 474 धावा उभारल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: लोटांगण घातलं. भारतानं अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला. 365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसरा डाव 103 धावांत आटोपला. एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं. संबंधित बातम्या :
बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजयरथावर स्वार
अफगाणिस्तानला 109 धावांत गुंडाळलं, फॉलोऑनची नामुष्की भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला
आणखी वाचा























