एक्स्प्लोर
Advertisement
आफ्रिदीला फार सीरियस घेऊ नका : गंभीर
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. आफ्रिदीला फार सीरियस घेण्याची गरज नाही, असं गंभीर म्हणाला.
मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हटलं की बहुतांश भारतीयांना काय आठवतं ते वेगळं सांगण्याची गरज नाही. सतत वादात सापडणाऱ्या आणि भारतीयांच्या नेहमी निशाण्यावर असणाऱ्या आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकली आहे.
शाहिद आफ्रिदीने काश्मीरमधील परिस्थितीला भारताला जबाबदार धरलं आहे. शिवाय यूएन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ याबाबतीत भारतावर काहीही कारवाई करत नाही, असंही तो बरळला. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
''काही पत्रकारांनी आफ्रिदीच्या ट्वीटबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? आफ्रिदी ज्या यूएनबद्दल बोलतोय, त्याचा अर्थही त्याला माहित नाही. यूएन त्याच्यासाठी अंडर 19 क्रिकेट आहे, ज्याच्या पलिकडे त्याला काहीच माहित नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,'' असा टोला गंभीरने लगावला आहे. काश्मीर प्रश्नावर आफ्रिदीचं ट्वीटMedia called me for reaction on @SAfridiOfficial tweet on OUR Kashmir & @UN. What’s there to say? Afridi is only looking for @UN which in his retarded dictionary means “UNDER NINTEEN” his age bracket. Media can relax, @SAfridiOfficial is celebrating a dismissal off a no- ball!!!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement