एक्स्प्लोर
भारताचा टेनिसस्टार लिएंडर पेसची विश्वविक्रमाशी बरोबरी
मुंबई : भारताच्या लिएंडर पेसनं डेव्हिस चषकात आणखी एका विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. पुरुष दुहेरीत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची पेसने बरोबरी केली. लिएंडर पेसनं बोपण्णाच्या साथीनं कोरियाविरुद्धच्या लढतीतील दुहेरी सामना जिंकला. यामुळे डेव्हिस चषक पुरुष दुहेरीत इटलीच्या निकोला पित्रांगेलीच्या सर्वाधिक 42 विजयांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. पेस गेल्या 25 वर्षांपासून डेव्हिस चषकात खेळतोय. पेस आतापर्यंत भारतासाठी पुरुष दुहेरीत 53 सामने खेळला असून त्यात तो केवळ अकरावेळा पराभूत झालाय. या विश्वविक्रमी विजयाबद्दल पेसची एकेकाळची मिश्र दुहेरीतली जोडीदार आणि दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हानंही पेसचं अभिनंदन केलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























