एक्स्प्लोर
Advertisement
बुमराला गाडी मिळाली, सर्वांना टपावर घेऊन धोनीने पळवली!
जसप्रीत बुमराला मालिकावीर म्हणून मिळालेल्या गाडीत टीम इंडियाने मैदानाची सवारी केली.
कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
विजयानंतर टीम इंडियाने मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केलं. जसप्रीत बुमराला मालिकावीर म्हणून मिळालेल्या गाडीत टीम इंडियाने मैदानाची सवारी केली. संपूर्ण संघाने या गाडीत सवार होत मैदानात फेरफटका लगावला. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीने या गाडीचं सारथ्य केलं.
भारताने या वन डे मालिकेत विजय मिळवत एखाद्या संघाला सहाव्यांदा व्हाईटवॉश दिला. तर श्रीलंकेला दिलेला हा दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने यापैकी तीन वेळा विराटच्या नेतृत्त्वात, दोन वेळा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात आणि एकदा गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात व्हाईटवॉश दिला आहे.
संबंधित बातम्या :
श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!
सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!
क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा
वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नाशिक
बॉलीवूड
Advertisement