एक्स्प्लोर
कानपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, किवींची दमछाक
कानपूर : विराट कोहलीची टीम इंडिया कानपूर कसोटीत विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांचं आव्हान दिलं आहे.
रविचंद्रन अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर किवी टीमची अवस्था चौथ्या दिवसअखेर 4 बाद 93 अशी बिकट झाली आहे. त्यामुळे कानपूर कसोटीवर भारताची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ल्यूक रॉन्की 38 आणि मिचेल सॅन्टनर 8
धावांवर खेळत होता.
टीम इंडियानं दुसरा डाव 5 बाद 377 धावांवर घोषित केला होता. भारताकडून चेतेश्वर पुजारानं 78 तर मुरली विजयनं 76 धावा केल्या. रोहित शर्मानं नाबाद 68 आणि रविंद्र जाडेजानं नाबाद 50 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनंही 40 धावा केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement